Home भंडारा साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे विदर्भस्तरीय दोन दिवशी कलाकार मेळावा संपन्न

साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे विदर्भस्तरीय दोन दिवशी कलाकार मेळावा संपन्न

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_201428.jpg

साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे विदर्भस्तरीय दोन दिवशी कलाकार मेळावा संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महामाया गीत गायन मंडळ साकोली व त्रिसरण कलाकार मंडळ सातलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय दोन दिवशीय कलाकार मेळावा 21 फरवरी व 22 फेब्रुवारी 2024 ला महात्मा फुले स्मारक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. 21 फरवरी ला झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उमेशजी गणवीर सामाजिक कार्यकर्ते ,दिनेश रंगारी सामाजिक कार्यकर्ते, पुष्पाताई निर्वाण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .रात्री साडेआठ वाजता धिक्कार या नाटकाचे आयोजन करण्यात आलेले होते .यावेळी अंकित कन्नाके, रहेसजी रंगारी ,चेतनजी राणे ,कोरे सर, टेंबरे सर रंगारी सर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 22 फरवरी 2024 ला झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन निखिल मेश्राम ग्रामपंचायत सदस्य तथा अभिनंदन बार सातलवाडा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथा सत्कारमूर्ती अनिताताई अनिरुद्ध बांबोळे ह्या उपस्थित होत्या .त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती डॉ. विजयकुमार यावलकर ,सत्कारमूर्ती पत्रकार तसा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे ,त्याचप्रमाणे वैशाली मडावी उर्फ लावण्या नृत्य कलाकार आणि खडी गंमत (तमाशा) , पत्रकार ऋग्वेद येवले सत्कारमूर्ती म्हणून यावेळी प्रामुख्याने उपस्थित .कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रबोधनकार उमेश बोरकर यांनी व त्यांच्या चमुने त्यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर नीलकंठ दूधपचार उपस्थित होते. रात्री आठ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंगेश भोंडे ,केशवभोंडे ,भीमावती पटले, शिवकुमार वैद्य ,अजय उके, त्रिवेंद रहांगडाले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कार्यक्रमाचे आयोजक प्रबोधनकार, उमेश बोरकर त्रिसरण बहुउद्देशीय कला मंडळ ,देशराज बोपचे, सुवर्णमाला गजभिये, शितल नागदिवे ,उत्तमा गडपाहिले, मंजूच्या खांडेकर ,नागबोधी गजभिये ,धम्मदीप सूर्यवंशी ,विवेक कुमार रामटेके, कुणाल बोरकर ,नम्रता राऊत ,दिगंबर बोपचे यांनी सहकार्य केले.

Previous articleप्रजासत्ताक दिन ते होळीनिमित्त  अंत्तोदय  अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रती कुटुंब एक साडी मोफत वाटप चे  उदघाटन  
Next articleभेंडा मुळा कारखान्याबाबत साखर आयुक्तांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here