आशाताई बच्छाव
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)प्रजासत्ताक दिन ते होळीनिमित्त अंत्तोदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रती कुटुंब एक साडी मोफत वाटप चे उदघाटन आज जालना शहरातील नूतन वसाहत येथील स्वस्त धान्य दुकानात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर दिवटे ना तह.मोरे मॅडम , राशन दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष मनीत कक्कड,सचिन घोडे,शाम वाघमारे,शैलेश कक्कड,अनिल घाडगे, फाहाद चाऊस,राम शहाणे,प्रदीप झिने, शिराळे ,देशमुख आदी ची उपस्थीती होती छायाचित्र किरण खानापुरे