Home सामाजिक शैक्षणिक जगतातील आधुनिक भगीरथ-डॉ कर्मवीर भाऊराव पाटील

शैक्षणिक जगतातील आधुनिक भगीरथ-डॉ कर्मवीर भाऊराव पाटील

171
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0028.jpg

शैक्षणिक जगतातील आधुनिक भगीरथ-डॉ कर्मवीर भाऊराव पाटील

शिक्षण हे व्यक्ती विकासाचे परिवर्तनाबरोबर साधन असून ज्यांचा या शिक्षणाशी संबंध आला नव्हता अशा समाजापर्यंत व्यक्ती पर्यंत शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे व त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे एक कर्मयोग होते. अशा कर्मवीरांची जयंती दरवर्षी २२ सप्टेंबरला साजरी केली जाते. त्या निमित्ताने त्यांच्या शिक्षणविषयक कार्याचा माहिती करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.परिश्रमाची आवड, प्रामाणिकपणा, स्वीकारलेल्या कार्याच् संदर्भात जागृकता स्वाभिमानी अशा संस्कारक्षम दरात २२ सप्टेंबर १९८७ रोजी भाऊरावांचा जन्म झाला. वडिलांचे नाव पायगोंडा तर आईचे नाव गंगुबाई होते. त्यांच्या बालपणी कृषी संस्कृतीत असणारी उदार वृती व सर्व समावेशकता त्यांना लाभली त्यांची प्राथमिक शिक्षणाची सुरुवात कुंभोज येथे झाली. तर माध्यमिक शिक्षणासाठी १९०२ मध्ये त्यांनी कोल्हापूर येथील जैन बोडिंगमध्ये ठेवून राजाराम हायस्कूल मध्ये पाठविण्यात आले. परंतु सहावी नंतर भाऊरावांनी शालेय शिक्षण सोडून दिले व पुढील आयुष्य शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे अज्ञानाच्या अंधःकारात चालणाऱ्या व सामाजिक विषमतेच्या आणि जातिभेदाच्या विळख्यात रुतून बसल्यामुळे सत्व गमावलेल्या चैतन्यहीन व अगतिक झालेल्या बहुजन समाजाच्या करुण अवस्थेला बाहेर काढण्यासाठी शिक्षण कार्याला वाहून घेतले.
शिक्षण हीच राष्ट्राच्या उन्नतीची गुरुकिल्ली आहे. हे जाणून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ४ आक्टोंबर १९१९ रोजी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. नंतर १९२४ मध्ये सातारा येथे स्थलांतरित करण्यात आली तीस फूट घेर असणारा तीनशे वर्षांचा वडीलधारा वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह म्हणून मान्यता पावला स्वावलंबी शिक्षण, कमवा व शिकारी जीवन मूल्यांचे महत्त्व पाठविणारी ब्रीदवाक्य ठरली. श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हा, नोकऱ्या मागु नका ज्ञानाचा, कष्टाचा साधेपणाचे मार्ग धरा. शेतकरी व्यापारी, संस्थानिक या समाज शक्तीचे प्रवाह अडवून संपत्तीचे पाठ रामाच्या मळयापर्यंत नेऊन खेडुताच्या झोपडीचे मंदिर बनवा ही शिकवण देऊन कर्तपणाच्या वाटेने जाणारी परिवर्तनाची, स्वाभिमानाची नवीन लिपी तयार केली म्हणूनचं रयत शिक्षण संस्थाही निव्वळ शिक्षण देणारी संस्था नाही तर सामाजिक परिवर्तनाची एक प्रयोगशाळा आहे असे उदगार यशवंतराव चव्हाण यांनी काढले.अशा सामाजिक पाश्र्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली रयत शिक्षण संस्थेस या विषम सामाजिक परिस्थितीनेच ताकद दिली ती ताकद स्वीकारणारा महामानव ही तेवढाच बलशाही होता. ज्या काळात समाजाला जातिबंधने करकचून आवळीत होती. त्याच वेळी या महापुरुषांने सर्व जातीपातीच्या मुलांना एकत्र ठेवण्याचा प्रयोग आरंभिला. हे करताना एक जातीविरहित समाजरचनेचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न साकार करण्यासाठी केलेल्या कार्याचा आरंभ रयतेच्या वस्तीगृह मुक्त शिक्षणातून झाला ही सुरुवात करणारे महापुरुष म्हणजेच पदाभूषण कर्मवीर डॉ भाऊराव पायगोंडा पाटील उर्फ अण्णा होते.सुरूवातीच्या काळात वसतीगृहाच्या दैनंदिन खर्च भागविणे अवघड होते दुधगाव काले व ने लें याठिकाणी वसतिगृहात सुरू केली त्यावेळची गोष्ट वसतिगृहात या मुलांची जेवणखाण याची पुस्तके, व्या, पाटी, दप्तराची, शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची मोफत सोय करायची म्हणजे हे काम अत्यंत खर्चाचे व अवघड होते. यामध्ये मोठा खर्च जेवणाचा होता. हे मोफत शिक्षण देण्याचे काम सातत्याने चालले पाहिजे खर्चाचे सातत्य राहिले पाहिजे व लोकांचा या कामात सहभाग आत्मीयता असली पाहिजे याकरिता भाऊरावांनी एक अभिनव योजना सुरू केली… वसतिगृहातील सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले त्याच्याकडून पैशाच्या रूपाने वसतिगृहात देणगी मिळणे अवघड ग्रामीण भागात पैसा हा गाडीच्या चाका एवढा मोठा म्हणजे त्यांच्याकडे पैसाच नसायचा.पूर्वीच्या काळात पिठाच्या गिरण्या नव्हत्या भल्या पहाटे उठून स्त्रिया घरीच दळण दळीता असत दळताना जात्यावर ओव्या व गाणी म्हणत असत. पायली दोन पायली धान्य दळून घामाने चिंब भिजत असत. दळणापूर्वी त्यांनी वसतिगृहाकरिता मूठभर धान्य काढून बाजूला ठेवायचे ही भाऊरावांची योजना गावागावातून घराघरांतून ही मुष्टीफंड योजना भाऊराव यांनी सुरू केली. जात्यावर एक पिशवी असे दळायला बाई जात्यावर बसली की सुपातले मूठभर धान्य तिने पिशवीत टाकायचे. एका आठवडयातून मुष्टीफंड योजनेचे धान्य घराघरांतून गोळा करायचे. हे काम वस्ती गृहातील विद्यार्थी करीत असत. गावातील प्रतिष्ठित मंडळी या योजनेला चांगले सहकार्य करीत असत.करूणाजनक असा एक प्रसंग एकदा भाऊराव संस्थेच्या कामाकरिता परगावी गेलेले होते वसतिगृहातील धान्य संपलेले होते. मागील थकबाकी असल्यामुळे उधार देण्यास कोणी दुकानदार तयार नव्हते. मुलांच्या जेवणाचे काय? मोठा प्रश्न उभा राहिला वसतिगृहाचा विद्यार्थी सेक्रेटरी आप्पालाल शेख हा होता वहिनीकडे जाण्याशिवाय त्याला उपाय नव्हताच नाइलाजास्तव आप्पालाल वाहिनीकडे गेला, वसतिगृहातील अडचण त्यानें वहिनीना सांगितली लक्ष्मी बाईकडेही देण्यासारखं काहीही नव्हतं. जे होतं ते वसतिगृहाकरिता खर्च झालेच होते. राहिला एक दागिना सौभाग्यलंकार मंगळसूत्र जो एक तरी अंगावर ठेवायला हवा होता. लक्ष्मीबाई सचित्र झाल्या. त्यांच्या मनाची दोलायमान अवस्था झाली. शेवटी त्यांनी मनाचा निश्चय केला. वसतिगृहातील बारा घरची मुले असली म्हणून काय झाले ती कुणाची आहेत. आपलीच मुलं ती घरी असती तर उपाशी राहिली नसती वणवण हिंडून त्यांना आणले होते कुणी ? त्यांना उपाशी ठेवून कसं चालेल ? भाऊरावांना हे चालणार नाही नव्हते. शिकण्याकरता त्यांना आणले ती शिकतील, त्यांच्या जीवनाचे सोने होईल, माझे सोने जाऊन त्यांच्या जीवनाचे सोने होणार असेल तर परम भाग्याची गोष्ट होईल, असा लक्ष्मीबाईने विचार केला.
लक्ष्मीबाई खरोखरच लक्ष्मी होत्या नावाप्रमाणे इतकी उदंड लक्ष्मी की कोणत्याही लक्ष्मीने येऊन त्यांच्या घरी पाणी भरावे लक्ष्मीबाई आत गेल्या, मंगळसूत्र काढून त्याची त्यांनी पुडी बांधली त्या बाहेर आल्या आपालाल च्या हातात पुडी देऊन त्या म्हणाल्या ‘बाळ’ हे घे मोड आणि त्याचे धान्य आण स्वयंपाक करून सर्व मुलांना जेऊ घाल आपपालालनी ती पुडी उघडून पाहिली नाही. असेल एखादा दागिना असे त्याला वाटले. सर्व मुलांना ज्यावेळी हे समजले तेव्हा मुलांचे डोळे पाण्याने भरून आले त्यांचा गहिवर थांबेन. लक्षमीबाई म्हणाल्या, ‘भाऊराव हेच माझा मोठा अलंकार आहेत’.स्वर्गातून ईश्वराने लक्ष्मीबाई पुण्यवृष्टी करावी असा हा प्रसंग मन हेलावून सोडणार.१९५२ मध्ये अमेरिकेतील प्रौढ शिक्षण तज्ञ डॉ. कोप यांनी भारत भेटीच्या वेळी रयत शिक्षण संस्थेस भेट दिली होती. त्यावेळी ते म्हणाले भाऊरावांच्या अंगीश्रद्ध, आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि धमक यांचा सुरेख संगम झाला म्हणून ते गुरू शोभतात.तर जय प्रकाश नारायण भाऊरावांचे कार्य पाहुन म्हणाले होते, शिक्षण क्षेत्रात समाजवादी सिद्धांताचा व्यावहारिक प्रयत्न चालू असलेला पाहून मला नुसती प्रसन्नताच वाटली नव्हे, तर मार्गदर्शनही झाले होते. भाऊरावांनी आपल्या चमत्कृती पूर्ण कार्याने अखिल भारत वासियांना एक नवा मार्ग दाखविला आहे. संत गाडगेबाबा, सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी यांनीही भाऊरावांच्या कार्याचे कौतुक केले होते. भाऊराव पाटलांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव म्हणून महा राष्ट्राच्या सामान्य जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी देऊन गौरविले होते. तर ५ एप्रिल १९५९ रोजी पुणे विद्यापीठाने त्यां ना डि.लीट. ही सन्माननीय पदवी बहाल केली होती. तर त्या अगोदर २६ जानेवारी १९९२ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले होते. अशा थोर शैक्षणिक जगातील आधुनिक भगीरथाचे ९ मे १९५९ रोजी पुणे येथील ससून रुग्णालयात निधन झाले. अशा महान मानवास विनम्र अभिवादन…..

श्री रोटे सी डी (प्राचार्य) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वनसगाव ता. निफाड

Previous articleकोटातील संस्था आत्महत्यांचे केंद्र बनत आहेत –  एंड  – आकाश सपेलकर अध्यक्ष ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन
Next articleकर्मवीर गणपत दादा मोरे यांना नांदुर्डी विद्यालयात अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here