Home सामाजिक सण रक्षाबंधनाचा

सण रक्षाबंधनाचा

177
0

आशाताई बच्छाव

IMG-20230826-WA0032.jpg

सण रक्षाबंधनाचा

रक्षाबंधन हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या भागात यास वेगवेगळी नावे आहेत. जसे नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा, कजरी पौर्णिमा, इत्यादी.
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण आहे. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम हे निस्वार्थी व पवित्र असते. राखीचा धागा केवळ साधा, सुती धागा नसून ते एक शांततेचे, आपुलकीचे, प्रेमाचे आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. ‘रक्षा’ म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे ‘धागा’. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते भावाला ओवाळते. भावाच्या सुखी, समृद्धी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्त्व दिले जाते.
या दिवशी बहिण भावाला त्याच्या आवडीचे गोड पदार्थ खाऊ घालते व भाऊही आपल्या प्रिय बहिणीला भेट वस्तू देतो.
या सणामागे अशी ही कथा आहे की महाभारतात कृष्णाने द्रोपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले. तर द्रौपदीने ही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाडून तो जखमेवर बांधला. तेव्हापासून श्रीकृष्णाने आणि द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण करण्याचे ठरवले.
आजच्या युगात रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणी यांच्या पुरता मर्यादित राहिला नाही. देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांना, महिला राखी बांधतात. तसेच पर्यावरण रक्षण करणाऱ्या वृक्षांना, तर काही तरी नोकर आपल्या मालकाला राखी बांधतात. राखी बंधनाच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. रक्षाबंधन भाऊ बहीण यांच्या पुरते न ठेवता निसर्गाची पूजा, गुरुची पूजा, आईवडिलांचे पूजा करून हा सण साजरा करावा. रक्षाबंधन हा सण शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. भारतामध्ये हा सण प्रचंड उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. अशा सणाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
सविता तावरे मुंबई स्पेशल रिपोर्टर युवा मराठा न्युज

Previous articleव-हाणे प्रकरणात कुठे “ते” राजकारणी भामटे; अन सत्याच्या वाटेवर चालणारे सिताराम पगारे एकटे!
Next articleचांदवड तालुक्यात वनविभागाच्या अधिका-यांकडून आदिवासींवर अन्याय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here