Home उतर महाराष्ट्र हर शिखर तिरंगा’ मोहिमेत ‘कळसूबाई’ वर फडकवणार तिरंगा..!

हर शिखर तिरंगा’ मोहिमेत ‘कळसूबाई’ वर फडकवणार तिरंगा..!

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20230820-WA0023.jpg

‘हर शिखर तिरंगा’ मोहिमेत ‘कळसूबाई’ वर फडकवणार तिरंगा..!

कर्नल रणवीर सिंग जामवाल यांची राष्ट्रीय स्तरावर मोहीम

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

हर घर तिरंगा’ मोहिमेतून नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ केली जात असतानाच कर्नल रणवीर सिंग जामवार यांनी ‘हर शिखर तिरंगा’ ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत देशभरातील सर्व राज्यांना भेटी देताना तेथील सर्वोच्च शिखर सर करून तेथे राष्ट्रध्वज फडकविला जात आहे. ही मोहीम महाराष्ट्रात दाखल झाली असून, मंगळवारी (ता. १५) कळसूबाई शिखरावर श्री. जामवाल व त्यांची आहे. टीम तिरंगा फडकवणार आहे.
धीरांग (अरुणाचल प्रदेश) येथील केंद्रीय संरक्षण विभागाशी संलग्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अॅन्ड अॅडव्हेंचर स्पोर्टस्चे संचालक व प्राचार्य आहेत. त्यांना विशिष्ट सेवा पदक व विशिष्ट सेवा पदकाने गौरविले आहे. त्यांनी आजपर्यंत जागतिक स्तरावर अनेक आव्हानात्मक शिखर सर करताना तिरंगा फडकविला आहे. तसेच त्यांनी 52 हून अधिक यशस्वी मोहिमांचे दिग्गज आहेत आणि ते एकमेव भारतीय आहेत ज्यांनी तीन वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे आणि सात खंडांच्या सर्वोच्च बिंदूंना स्पर्श करून सात शिखरे सर केली आहेत.तसेच गिर्यारोहण मोहिमांमधून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनदेखील यशस्वी केले आहे. देशातील प्रत्येक राज्यातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकविण्याच्या उद्देशाने त्यांनी तीन महिन्यांपूर्वी ‘हर शिखर तिरंगा’ मोहीम हाती घेतली. तेव्हापासून ते विविध राज्यांना भेटी देताना तेथील सर्वोच्च शिखर सर करून तेथे तिरंगा फडकवत आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सुबेदार रवी देवडकर, सुबेदार तस्वेसंग चोसगिल, हवालदार नेहपाल सिंग, राकेश यादव, केवल क्रिशन, नाईक गणेश पौल, लोगू के., संकय कुमार, लोबसंग बापू, रूपक छेत्री, थुपतेन, राजा रामाचार्य सम्यक राज मेहता यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक स्तरावर ‘निमास’चे माजी विद्यार्थी या मोहिमेशी जोडले जात असताना शिखर सर करत आहेत. या ऐतिहासिक मोहिमेंतर्गत कर्नल जामवाल व त्यांची टीम स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकविणार आहेत.. यासाठी ते नाशिकमध्ये दाखल झाले. येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन ‘निमास’ची माजी विद्यार्थिनी चेतना शर्मा करत आहे

हर शिखर तिरंगाचा प्रवास असा
अरुणाचल प्रदेश, मणिपूर, शिलाँग, आसाम, त्रिपुरा, नागालँड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यातील शिखर त्यांनी आजपर्यंत सर केले आहेत. महाराष्ट्रातील दौरा पूर्ण करताना ते गोव्याला रवाना होणार आहे. तेथून कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, सिक्कीम, पश्चिम बंगाल या राज्यांतील सर्वोच्च शिखर सर करणार आहेत.

मातृभूमीसाठी मोहीम
कर्नल श्री. जामवाल कळसूबाई सर केल्यानंतर ‘एक मोहीम मातृभूमी के लिए’ अंतर्गत आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी अडीचला मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत त्यांचा सत्कार होणार असून, त्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. यानिमित्त सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून, विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.

कोण आहेत कर्नल जामवाल?
कर्नल जामवाल यांना सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आलेले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अॅण्ड अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचे ते संचालक व प्राचार्य आहेत. चाळीस वर्षांहून अधिक कालावधीचा त्यांचा गिर्यारोहणाचा अनुभव आहे. भारत व आशियाई स्तरावर त्यांनी विक्रम नोंदविले आहेत. त्यांनी तीन वेळा एव्हरेस्ट सर केले असून, जगभरातील ७ सर्वोच्च शिखरांवर भारताचा तिरंगा फडकविण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला आहे…

🟡जामवाल हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ‘हर शिखर तिरंगा’ मोहिमेसाठी रवाना झाले आहेत. जामवाल यांनी तीन वेळा माउंट एव्हरेस्ट आणि जगातील 50 हून अधिक उंच शिखरांवर तिरंगा फडकावला आहे. जामवाल यांना मोहिमांद्वारे देशातील पर्वतांची माहिती देशवासियांना द्यायची आहे. जामवाल म्हणाले की, लोक अनेकदा पर्वतारोहणासाठी इतर देशांमध्ये जातात, परंतु देशात अनेक सुंदर पर्वत आहेत, ज्यासमोर स्वित्झर्लंडच कमी ठरते. देशातील सर्व उंच शिखरांवर तिरंगा फडकवून लोकांना जागरूक करायचे आहे.

Previous articleलेखन करत रहा आपली कविता आपल्याला एक दिवस ओळख देईल—प्रा.वा.ना.आंधळे’
Next articleकै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा यशस्वी केरबाजी सावकार बिडवई यांचे प्रतिपादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here