आशाताई बच्छाव
सटाणा प्रतिनिधी(जगदिश बधान):सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्रीगणांकडून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोकळ्या हाताने भरघोस निधी मिळत आहे.त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या निधीतून मतदारसंघातील ग्रामीण भागासोबतच सटाणा शहराचाही विकासाचा अनुशेष भरून काढला जात आहे.सटाणा शहरातील जनतेच्या सेवा सुविधांसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत.खास बाब म्हणजे, सटाणा शहराच्या विकासासाठी आमदारकीच्या माध्यमातून आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे,असे प्रतिपादन आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी केले. शनिवारी(दि.२२) लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात नगर विकास निधीतून १०कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
सटाणा शहराच्या विकासासाठी आमदार बोरसे यांच्या पाठपुराव्यातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे.शनिवारी(दि.२२) शहरातील शिवनेरी हाउसिंग येथील काँक्रिटीकरण,प्रभाग क्रमांक एकमधील वैकुंठधाम ते गोसावी दफणभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक १० रस्ता कॉंक्रिटीकरण,शनी मंदिर ते बागायत पांधी रस्ता सुधारणा,संतोषनगर रस्ता कॉंक्रिटीकरण,विवेकानंद नगर रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण,प्रभात क्रमांक ४ मधील गोपाळनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण,शेतकी संघाच्या पाठीमागील चौगाव अजमिर सौंदाणे रस्ता खडीकरण व डांबरीकरण तसेच राष्ट्रीय महामार्ग ते चौगाव नवे रातीर रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा आदि कामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे,माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज ठाकरे, भाजपचे जेष्ठ नेते श्रीधर तात्या कोठावदे, साहेबराव सोनवणे,रमेश देवरे, दिनकर सोनवणे,काका सोनवणे ,राहुल पाटील,शिवाजी सोनवणे,मयूर सोनवणे,निर्मला भदाणे,भास्कर सोनवणे,शैलेश कोठारी,आनंद ओस्तवाल,नाना बोरकर,दत्तू बैताडे,विलास दंडगव्हाळ,लखन पवार, भरत पवार,सुहास सोनवणे,विजय कन्नल,ब्रिजेश गुप्ता,केदा ह्याळीज,रवींद्र देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी-सटाणा:शहरातील विकासकामांचा शुभारंभ करताना आमदार दिलीप मंगळू बोरसे समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे,माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, भाजपचे जेष्ठ नेते श्रीधर तात्या कोठावदे ,विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज ठाकरे आदि.