Home नांदेड ▪️लग्नास नकार दिल्याने प्रियकर व प्रियासी ने उचलले टोकाचे पाऊल; विषारी औषध...

▪️लग्नास नकार दिल्याने प्रियकर व प्रियासी ने उचलले टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा केला प्रयत्न..

203
0

आशाताई बच्छाव

IMG-20230706-WA0058.jpg

▪️लग्नास नकार दिल्याने प्रियकर व प्रियासी ने उचलले टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा केला प्रयत्न..
▪️तरुणी चे निधन तर तरुण अत्यवस्थ..
▪️मुलीच्या आईने केला पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
लोहा तालुक्यातील मात्र उस्माननगर पोलिस ठाणे हद्दी अंतर्गत असलेल्या भोपाळवाडी येथे तरुणीच्या राहत्या घरी तरुणाने विषारी औषध घेवून जात बाथरूम मध्ये तरुण आणि तरुणीने अर्थात प्रियकर आणि प्रियसीने विषारी औषध प्राशन केले. त्यात तेवीस वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला तर तरुणाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. तरुण आणि तरुणी हे नातेवाईक असल्याचे समजते. याप्रकरणी मयत तरुणीच्या आईने उस्माननगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुण विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील कलंबर नजिक भोपाळ वाडी येथील पंचवीस वर्षीय तरुण रोहिदास पद्माकर जाधव याचे गावातच राहणाऱ्या अत्याची मुलगी सुप्रिया मारोती जाधव (वय २३) हिच्याशी मागील काही कालावधी पासून प्रेमसंबंध होते. तरुणाच्या वडिलांनी नात्याने चुलत बहीण असलेल्या लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडे मुलगा रोहिदास व सुप्रियाचा विवाह करण्याची मागणी केली असता लक्ष्मीबाई यांनी विरोध दर्शविला. चिडलेल्या तरुण रोहिदास याच्या मनात विवाह होत नसल्याची सल झाल्याने त्याने दि. ३ जुलै रोजी मध्यरात्री साडे तीन वाजता घरात प्रवेश करून सुप्रिया हिस त्यांच्याच बाथरूम मध्ये घेवून जात शितपेया च्या बॉटल मध्ये घेवून गेलेले विषारी औषध सुप्रिया हिस पाजवून आपण स्वतः देखील ते प्राशन केले. कांहीं वेळानंतर सुप्रिया बाथरूम मधून बाहेर आली त्यापाठोपाठ रोहिदास देखील बाथरूम मधून बाहेर आला. कांहीं वेळानंतर तरुणीस उलट्या होत असल्याने तिची चौकशी केली असता. रोहिदास याने विषारी औषध पाजल्याचे तिने आईला सांगितले. असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यानंतर तत्काळ तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र दि. ४ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता सुप्रिया मरण पावली. तर रोहिदास याच्यावर उपचार सुरू आहेत. सदरील घटनेप्रकरणी मयत तरुणीच्या आईने उस्माननगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. गाडेकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here