Home नांदेड लोहा तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस; शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग

लोहा तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस; शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग

174

आशाताई बच्छाव

IMG-20230706-WA0055.jpg

लोहा तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस; शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
जुन महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. मात्र मागिल दोन दिवसा पासुन दडी मारून बसलेल्या मृगराजाने तालुक्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आणि बळीराजा सुखावला असून कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आनंद झाला तर उर्वरित शेतकऱ्यांनी खोळंबलेल्या खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी लगबग सुरू केली असल्याचे चित्र लोहा तालुक्यात सर्वदूर दिसून येत आहे.
मागील दोन दिवसांपासून पावसाने एन्ट्री केली असून मंगळवारी रात्री सर्वसाधारण तर बुधवारी रात्री उसंत घेत रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील मूग उडीद आदी तृणधान्य पिकांची पेरणी शक्य नसल्याचे मत कांहीं शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पेरणीयोग्य नव्हे तर पाऊसच झाला नसल्याने खरिप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रारंभी पाऊस होईल या आशेने बळीराजाने कपाशी लागवड केली मात्र पाऊस झाला नसल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. तालुक्यातील जवळपास तीन टक्केच पेरण्या उरकल्या होत्या. आता मात्र दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खोळंबलेल्या उर्वरित खरीप हंगाम पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांनी लगबग सुरू केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.