Home सोलापूर शकरराव वाघमारे याचा राष्ट्रीय डाळिंब संशाधन व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

शकरराव वाघमारे याचा राष्ट्रीय डाळिंब संशाधन व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

138

आशाताई बच्छाव

IMG-20230706-WA0027.jpg

शकरराव वाघमारे याचा राष्ट्रीय डाळिंब संशाधन व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

मोहोळ
सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रिय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली आहे. सदरची निवड ही आगामी तीन वर्षा साठी करणेत आली आहे. शंकरराव वाघमारे यांचे पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सामाजिक, राजकीय कारकिर्द सुरू झाली. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून १० वर्ष पक्ष संघटनेत काम केले नंतर त्यांना दोन वेळा मोहोळ तालुका अध्यक्ष म्हणून १९९५ ते १९९९ या काळात संधी मिळाली. तसेच ३ वेळा जिल्हा सरचिटणीस तीन वेळा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राज्य परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, संजय गांधी निराधार समिती सदस्य, सौंदणे (ता. मोहोळ) ग्रामपंचायत सरपंच,माळी महासंघाचे किसान आघाडी चे प्रदेश अध्यक्ष आदी पदावर काम केले आहे. ते सतत ३८ वर्ष भाजप मध्ये सक्रिय काम करीत आहेत.

Previous articleलोहा तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस; शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग
Next articleशहादा जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्टाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.