Home नांदेड लोह्यातील कै. नळगे विद्यालयात साप विद्यार्थ्यांसह गुरुजनांची उडाली भंबेरी

लोह्यातील कै. नळगे विद्यालयात साप विद्यार्थ्यांसह गुरुजनांची उडाली भंबेरी

374
0

आशाताई बच्छाव

IMG-20230704-WA0072.jpg

लोह्यातील कै. नळगे विद्यालयात साप विद्यार्थ्यांसह गुरुजनांची उडाली भंबेरी
लोहा,
शहरातील कै. विश्वनाथ राव नळगे विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या शाळा परिसरात भला मोठा साप दिसताच पळा पळा.. साप साप.. म्हणत विद्यार्थी ओरडत पळत सुटले. गुरुजनानी काय झाले म्हणत माहिती घेतली असता एक साप शाळा परिसरातील अवार भिंती लगत अडगळीत असल्याची माहिती मिळाली. साप दिसताच विद्यार्थ्यांसह गुरुजनांची भंबेरी उडाली. शाळा प्रशासनाने सर्पमित्रास पाचारण केले. सर्पमित्राने सदर सापास पकडुन त्यास जंगलात सोडून दिल्याची घटना दि. ४ जुलै रोजी सकाळी घडली.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरात कै. विश्वनाथ राव नळगे विद्यालयाच्या अवरभिंती लगत अडगळीत एक साप असल्याचे कांहीं विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केली. मग त्याकडे शिक्षक मंडळींनी ही धाव घेतली. कांहीं जाणकारांच्या लक्षात आले की, सदरील साप हा धामिन जातीची आहे. मात्र धामिनिस पकडण्याची कुणाचीही हिम्मत होईना. मग गुरुजनानी विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील पवार व स्वच्छतादुत राजीव तिडके यांच्या सहकार्याने सर्पमित्र गणेश बोडखे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अवघ्या कांहीं वेळात धामिन जातीच्या भल्या मोठ्या सापास पकडुन जंगलात सुरक्षित रित्या सोडून दिले. याप्रसंगी सर्पमित्र गणेश यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सापाची सविस्तर माहिती दिली. यावेळी शाळेच्या सहशिक्षिका तथा माजी नगरसेविका शोभाताई नळगे – बगडे, सहशिक्षक रवी चव्हाण, श्रीमती वाले, ठाकूर सर, अंकुलवार सर, उत्तरवार सर , शैलेश , सचिन , योगेश सह बहुसंख्येने विध्यार्त्यांची उपस्थिती होती

Previous articleगुरुवारी कॉग्रेस अंल्पसंख्याक भव्य मेळावा प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleनाशिकमध्ये आषाढी एकादशी निमित कार्यक्रम संपन्न                 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here