Home सामाजिक संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा

संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0027.jpg

संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवाच्या संत मेळाव्यातील वारकरी संत होते. यांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा गावात झाला असून ते महार जातीचे होते. हे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असे.सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे. संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके 1200 साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरीत भरभराट होता. त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले. पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्म मेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.दैन्य, दारिद्‌ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. त्यांना मंदिरात प्रवेश न्हवता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगाच्या भक्तिरसात लीन झाले . संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाज बांधवांना दिला. ध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे 13व्या शतकात उदयास आली.

भागवत कथाकार हभप शंकरराव कोल्हे (नैताळे)
नाशिक जिल्हा अध्यक्ष- वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

Previous articleआषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप मोखाडा
Next articleगुरुपौर्णिमेनिमित्त येवती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here