Home नांदेड प्रा.रविंद्र बाविस्कर यांना सैनिकी विज्ञान विषयात पीएच.डी.पदवी प्रदान

प्रा.रविंद्र बाविस्कर यांना सैनिकी विज्ञान विषयात पीएच.डी.पदवी प्रदान

61
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230705-193008_WhatsApp.jpg

प्रा.रविंद्र बाविस्कर यांना सैनिकी विज्ञान विषयात पीएच.डी.पदवी प्रदान
मुक्रमाबाद प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील सैनिकी विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र बाबुराव बाविस्कर यांना नुकतीच दिनांक 30 जुन 2023 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी सैनिकी विज्ञान या विषयातून विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे.डॉ. रविन्द्र बावीस्कर यांनी “दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेत (सार्क) भारताची आर्थिक भूमिका – एक अभ्यास” या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांनी हे यश मिळविल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील गोजेगावकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक इनामदार, श्री छ. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य श्री मुकुंदराज जाधव, छ.संभाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भायेगावे बी. के., मुख्याध्यापक कापसे, मुख्याध्यापक सूर्यवंशी तसेच शाळा व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले .

Previous articleलातूर जिल्ह्यात शिवसेना (उध्दव ठाकरे गटाच्या ) नियुक्त्या जोरात सुरु!             
Next articleप्रा.नारायण पांचाळ यांना पीएच.डी.पदवी प्रदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here