आशाताई बच्छाव
संजय जोशी यांच्या उप शहर प्रमुखपदाचा राजीनामा
देगलूर तालुका प्रतिनिधी, गजानन शिंदे
देगलूर उ. बा. ठाकरे शिवसेना उप शहर प्रमुख संजय जोशी वयाच्या आठव्या वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आजपर्यंत पूर्ण निष्टने शिवसैनिक म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत पक्ष कसे वाढेल या साठी काम करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असे.
काल झालेल्या नवीन पद वाटपात संजय जोशी यांची दाखल न घेता नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या पैशाची खैरात करणाऱ्या व ज्याच्या जवळ चार चाकी वाहन आहे अशा लोकांना पदाची खैरात केल्यामुळे मी संजय दत्तात्रय जोशी उप शहरप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्याकडे पाठविले असल्याचे निवेदणाद्वारे कळविण्यात आले.
सविस्तर माहिती अशी कि, वयाच्या आठव्या वर्षी प्रभागातील शाखाप्रमुख ते उप शहरप्रमुख हा प्रवास बतीस वर्षाचा असून गेल्या दोन वर्षपासून संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांना वारंवार विनंती करूनही कोणत्याही नेत्यानि माझी साधी दाखल सुद्धा घेतली नही.मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे मी फक्त शिवसैनिक म्हूणन काम करणार असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.