Home जालना डमी पावतीबुकाद्वारे कारखानदारांची फसवणुक करणाऱ्या गुंडेवाडीचे सरंपच मनोहर पोटे विरूध्द गुन्हा दाखल...

डमी पावतीबुकाद्वारे कारखानदारांची फसवणुक करणाऱ्या गुंडेवाडीचे सरंपच मनोहर पोटे विरूध्द गुन्हा दाखल करावा

135
0

आशाताई बच्छाव

IMG-20230625-WA0015.jpg

डमी पावतीबुकाद्वारे कारखानदारांची फसवणुक करणाऱ्या
गुंडेवाडीचे सरंपच मनोहर पोटे विरूध्द गुन्हा दाखल करावा
शिवसेना प्रनित किसानसेनेचे जिल्हाध्यक्ष नारायणराव गजर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील सरपंच मनोहर पोटे यांनी डमी पावतीबुक (टॅक्स बुक) छपाई करून गुंडेवाडी परिसरातील कंपन्यांकडून लाखो रूपये वसुल केल्या प्रकरणी त्यांच्यासह त्यांना साथ देणारे त्यांचे छोटे भाऊ विकास पोटे आणि वडील ज्ञानेश्वर पोटे यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रनित किसानसेनेचे जिल्हाध्यक्ष नारायणराव गजर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, गुंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 20 ते 22 कारखाने असून या कारखान्यांकडून गुंडेवाडीचे सरपंच मनोहर  पोटे यांनी डमी पावतीबुक (टॅक्स बुक) छापुन लाखो रूपये वसुल केले आहे. तसेच त्यांना सहकार्य करणारे त्यांचे लहान भाऊ विकास पोटे आणि वडील ज्ञानेश्वर  पोटे यांनी देखील कंपन्यांवर दबाव आणून डमी टॅक्स बुकाद्वारे कंपन्यांची आणि ग्रामस्थांची  फसवणूक केली आहे. या प्रकरणी आपण ग्रामसेवक वसावे मॅडम यांना विचारपुस केली असता त्यांनी स्पष्ट सांगीतले की, त्या टॅक्स पावत्या ग्रामपंचायतच्या नाही आणि त्या पावतीवर माझी स्वाक्षरी ती पण माझी नाही आणि सदरील पावती बुकावरील नंबर देखील ग्रामपंचायतला उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, कारखानदारांना दिलेल्या पावत्या प्रत्येकी 80 हजार रूपयांच्या तीन पावत्या असून त्यामध्ये 1) 007, 008 009 अशा क्रमांकाच्या या पावत्या आहेत. या पावत्यांची एकुण रक्कम 2 लाख 40 हजार रूपये एकाच कंपनीकडून नगदी स्वरूपात घेतल्याचे निदर्शनास येत आह�

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here