Home गडचिरोली सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : भाई रामदास जराते यांचे आवाहन

सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : भाई रामदास जराते यांचे आवाहन

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0089.jpg

 

सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : भाई रामदास जराते यांचे आवाहन

चामोर्शी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :- रासायनिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले असून शेती हा नफ्याचा व्यवसाय होण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करुन उत्पादन घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.

चामोर्शी येथील साधूबाबा कुटीमध्ये पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या सदस्य निवडी करीता आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे सेंद्रिय शेती उपक्रम राबवून घेतलेल्या उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था उभी करण्यात येणार असल्याचेही भाई रामदास जराते यांनी सांगितले.

चामोर्शी तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावागावात शेकापक्षाच्या शाखांची स्थापना करण्यासंबंधाने आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

या बैठकीला पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तितिक्षा डोईजड, गायत्री मेश्राम, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, गंगाधर बोमनवार, श्रीकृष्ण नैताम, राजू केळझरकर, पवित्र दास, देवराव शेंडे, अनिमेश बिश्वास, मारोती आगरे, भैय्याजी कुनघाडकर, प्रशांत मंडल, सुभाष आकलवार, दिपक मिस्त्री, महाराज मंडल, गुरुदास हुलके, हेमंत बोदलकर, अनिल आगरे उपस्थित होते.

Previous articleशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सातसमित्या – अब्दुल सत्तार
Next articleमहिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागते —संगीता तावरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here