Home जळगाव काळजीपोटी बांधलेला रुमालच ठरला चिमुकल्याचा कर्दनकाळ

काळजीपोटी बांधलेला रुमालच ठरला चिमुकल्याचा कर्दनकाळ

149
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0064.jpg

काळजीपोटी बांधलेला रुमालच ठरला चिमुकल्याचा कर्दनकाळ

जळगाव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील. :– जामनेर शहरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आपल्या तान्हुन्याला बाळाला झोक्यात झोपूवन आई कामावर निघून गेली, तो झोक्यातून पडू नये म्हणून त्याला रुमाल बांधला, मात्र हाच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला आहे. उठल्यानंतर झोक्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात बांधलेल्या रुमालाचा गळफास लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत घडली आहे. निर्भय वसंत इंगळे असं अवघ्या एका वर्षाच्या मयत चिमुकल्याचं नाव आहे. दहा दिवसांपूर्वीच निर्भयचा पहिला वाढदिवस साजरा झाला होता.

जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कामावर जाण्यापूर्वी मुलगा निर्भयला दूध पाजले. मग त्याला झोक्यात झोपविले. निर्भय झोक्यातून पडू नये म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या धाकट्या बहिणीला निर्भयवर लक्ष ठेवण्यात सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली.

निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील निर्भयकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. त्यानंतर जेवण करून परतल्यानंतर पुन्हा निर्भयला पाहण्यासाठी मावशी केली असता, निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला दिसून आला. ते पाहून निर्भयच्या मावशील धक्काच बसला. तिने त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने लक्षात आल्याने तिने निर्भयच्या आई व वडिलांना तात्काळ बोलावून घेतले.

निर्भयला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दुर्दैवी घटनेने गिरीजा कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleजनतेच्या विश्वासार्हतेला आम्ही प्राणपणे जपू – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
Next articleमहा जनसंपर्क अभियान यशस्वी करा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here