Home जालना हिरकणी महोत्सवानिमित्त महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

हिरकणी महोत्सवानिमित्त महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

90
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0055.jpg

हिरकणी महोत्सवानिमित्त महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

मोफत अरोग्य तपासणी शिबीर; सर्पमित्र प्रतिभा ठाकरे आणि टीव्ही स्टार शाहीर रामानंद उगले राहणार उपस्थित

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 28 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुना जालना येथे हिरकणी महोत्सव व हिरकणी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त महिलांना भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. महिलांसाठी खास प्रबोधनात्मक सांस्कृतीक कार्यक्रमासह मोफत आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातून महिलांच्या न्याय हक्कासाठी तसेच महिला सक्षमीकरण करुन त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी संस्थेच्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच प्रमाणे या वर्षी हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आ. कैलास गोरंट्याल तर अध्यक्ष म्हणून प्रसिध्द उद्योजक सामाजसेवक सुनिलभाई रायठ्ठा यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना तर प्रमुख पाहुने म्हणून सहाय्यक आयुक्त अमित घवले, उद्योजक घनशासमदास गोयल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अ‍ॅड. अश्विनी धन्नावत, सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर, स.पो.नि. अर्चना पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी छोट्या पडद्यावर आपल्या जादूई आवाजाने आख्या महाराष्ट्राला भुरळ घालणारा टीव्ही स्टार शाहीर रामानंद उगले यांचा खास सांस्कृतीक आणि पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच महिला सर्पमित्र प्रतिभा ठाकरे यांचा साप आणि माणूस या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. महिलांना करणी आणि भानामती क

Previous articleपावसाळ्यापूर्वी विजेच्या कामांना प्राधान्याची गरज..! विद्युत खांबाना कुठे”कुठे झाडांच्या फांद्यांचा अडस
Next articleधिरज बाहेती याने पटकावले 94.50 टक्के गुण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here