Home बुलढाणा BREAKING बुलढाणा शहरात धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न; व्यापारी हॉल फोडण्याचा प्रकार !...

BREAKING बुलढाणा शहरात धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न; व्यापारी हॉल फोडण्याचा प्रकार ! – निर्भीड पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्यावर हल्ल्याचा संशय !

86

आशाताई बच्छाव

1001541575.jpg

BREAKING बुलढाणा शहरात धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न; व्यापारी हॉल फोडण्याचा प्रकार ! – निर्भीड पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्यावर हल्ल्याचा संशय !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, शहरातील कारंजा चौकाजवळील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेला व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान झुंजार लेखणीतून निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या जितेंद्र कायस्थ यांचे घर तिथेच असल्याने सदर गुन्हेगार त्यांच्यावर हल्ला करायला तर आला नव्हता ना? असा संशय बळावला आहे.
सदर घटनेत संजय कुलकर्णी यांचे चिरंजीव चिन्मय यांनी या चोराला पकडण्याचा धाडसी प्रयत्न केला, मात्र चोराने त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. स्थानिक नागरिकांनीही चोराला पकडण्याचे प्रयत्न केले असता तो फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून, सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला असून लवकरच आरोपी पकडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पोलिसांनी हा दरोडा होता की विशिष्ट व्यक्तींवर केलेला हल्ला याचा सखोल तपास सुरू ठेवला आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांना होत असलेला धोका तपासाचा भाग आहे. यापूर्वी देखील पत्रकार जितेंद्र कायस्थ यांची सुपारी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता, हे विशेष! या घटनेने शहरातील व्यापारी, नागरिक आणि पत्रकार समुदायामध्ये तणाव निर्माण केला आहे. बुलढाणा राणा पोलिस प्रशासनाने या धाडसी हल्ल्याच्या मागील कारणांचा शोध लावून दंडात्मक कारवाई करण्याचा इरादा दर्शविला आहे या धक्कादायक प्रकारामुळे बुलढाणा शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सुज्ञांचे मत आहे. आगामी काळात या घटनेवरून पुढील महत्त्वाचे खुलासे होणार आहेत. बुलढाणा पोलिसांनी तपास सुरू केला असून, सर्व संबंधित घटकांवर लक्ष ठेवले आहे. या धाडसी अनुचित प्रकारामुळे शहरात सुरक्षा उपाय वाढवण्याची गरज भासत आहे.

Previous articleमरावे परी किर्ती रुपी उरावे साकेगाव येथील राजू जाधव यांनी केले देहदान….
Next articleवाघाडी येथे संत शिरोमणी भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.