Home बुलढाणा मरावे परी किर्ती रुपी उरावे साकेगाव येथील राजू जाधव यांनी केले देहदान….

मरावे परी किर्ती रुपी उरावे साकेगाव येथील राजू जाधव यांनी केले देहदान….

168

आशाताई बच्छाव

1001541562.jpg

मरावे परी किर्ती रुपी उरावे साकेगाव येथील राजू जाधव यांनी केले देहदान….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली तालुक्यातील मौजे साकेगाव येथील माजी सैनिक यांचे धाढसी पुत्र स्व राजू वासुदेव जाधव राजू जन्म दिवस 15 एप्रिल 1994 आणि मुर्यू 25मे2025 या 31 वर्षाची जीवन यात्रे मध्ये राजू संघर्ष मय जीवन जगला, असे म्हणायला हरकत नाही. राजू तीन वर्षाचा होता. 7 जैल 1997 ला आई मरण पावली. तर आईचे सारखं प्रेम माजी सैनिक वासुदेव जाधव हे शेवट पर्यंत राजू करिता कुठंच कमी पडले नाही. फोजी राजू सोबत मुलगा म्हणून कधीच राहले नाही. ते
दोघेही एकमेकांचे मित्र समजून राहात होते. ते दोघेही एकमेकांना समजून घ्यायचे राजूचे शिक्षण. BSC. ऍग्री झाल्या नंतर राजू पोखरा योजने मध्ये जालना जिल्हा आणि जळगाव जिल्या मध्ये काम केलेले आहे.त्याला सोबतचे मित्र म्हणायचे राजू तू एव्हडा हुशार माणूस तू आय. एस किंवा आय पी एस हया परीक्षा पास होणारा आहे. ते राजूला पटल्यामुळे राजूने त्या दिशेने वाटचाल सुरु केली असून आता राजूचा येणाऱ्या 4 जूनला 2025 ला पेपर सुद्धा होता. परंतु गेल्या चार पाच महिन्या पूर्वी राजूची तबेत साथ देत नसल्यामुळे फोजी यांनी राजुला उपचारासाठी हैद्राबाद. त्या नंतर. सैनिक कमांड हॉस्पिटल पुणे येथे घेले असता. फोजी आणि डॉक्टर यांची हॉस्पिटल मध्ये हळु अवाजातील चर्चा राजूला शंकास्पद वाटली. तेंव्हा राजू याने डॉक्टर यांना विचारपूस करायला सुरुवात केली. डॉक्टर साहाब मुझे क्या प्रॉब्लेम है. तर डॉक्टर म्हणले. कुछ नहीं हुवा / आप पेशंट है. तो, पेशंट जैसे रहो../ तर राजू आणि डॉक्टर राजू यांचा थोडा वाद झाला होता.. राजू डॉक्टरांना म्हटला की, डॉक्टर साहाब आप मुझसे कुछ छुपा रहे हो.. मुझे क्या हुवा. सच बताओ, सच बताओ, तर डॉक्टरांनी फोजी यांना एका बाजूला घेऊन हा विषय सांगितला. आपका लाडका. सच बताओ.. सच बताओ.. तर फोजी बोलले. काही हरकत नाही. बताओ लडका डरता नहीं. /लडका बहुत समजदार है / डॉक्टरने राजूला संपूर्ण विषय समजून सांगितला. आता राजूच्या मनातील विषय : वडिलांचे संपूर्ण प्रयत्न करुन झाले. आणि डॉक्टरही म्हणतात. आता कुठंच विलाज होणार नाही.बुलडाणा माझ गांव माझा जिल्हा तर राजुने त्याच दिवशी विचार केला होता. 31 वर्ष जगलो. या पुढचे माझे जे स्वप्न होते. ते अधुरे झे स्वप्न अधुरे राहले, तरी राहणार आहे. माझे स्वप्न अधुरे राहले, तरी चालेल पण माझ्या सारखी वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये. त्यासाठी माझे देहादान झाले म्हणजे. माझे पूर्ण शरीर मेडिकल कॉलेज मध्ये कायम संशोधन करण्यासाठी राहील. आणि माझ्यावर ही वेळ आली ती वेळ कोणत्या कारणामुळे आली असेल. त्यावर संशोधन होत राहील.. असं पुन्हा कुणासोबत घडणार नाही. यासाठी राजुने देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. राजू बापाला हेही बोलून गेला होता. पप्पा मी मरणार तर नाहीच. कदाचित मरण पावलोच. तर मी जिवंत असणार. कारण मी देहदान करणार आहे. एक तर मी प्रयोग शाळे मध्ये असणार. नाही तर, माणसाच्या शरीरा मध्ये एकूण 206 हाडे असतात. जिथं कमी तिथंच असणार मी. हे राजूचे जिवन्त असतांनाचे जिवन्त वाक्य. जय हिंद.. जय महाराष्ट्र.