Home बुलढाणा रेती माफीयांची अनोखी शक्कल, पावसामुळे चिखल झाला म्हणून चक्क गाढवाहून रेतीची वाहतूक…….

रेती माफीयांची अनोखी शक्कल, पावसामुळे चिखल झाला म्हणून चक्क गाढवाहून रेतीची वाहतूक…….

94

आशाताई बच्छाव

1001541551.jpg

रेती माफीयांची अनोखी शक्कल, पावसामुळे चिखल झाला म्हणून चक्क गाढवाहून रेतीची वाहतूक…….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-सिंदखेडराजा मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असतानाच, रस्त्याची दयनीय अवस्था व रस्त्यात साचलेला चिखल यामुळे गाडी चालवण्यास येणारा अडथळा लक्षात घेता रितीमाफी यांनी चक्क गाढवावरून रितीची वाहतूक करताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दुसरबीड जवळ राहेरी बुद्रुक परिसरात अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.विशेष बाब म्हणजे, आता रेती माफियांनी नवी शक्कल लढवून गाढवांचा वापर करून रेतीची वाहतूक सुरू केली आहे. यामुळे प्रशासनाच्या नजरेत न येता लहान वाटांनी रेती चोरीला जात आहे. या प्रकारामुळे परिसरात पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, कायद्याची खिल्ली उडवली जात आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात रेतीची तस्करी हा चर्चेचा विषय ठरत चालला आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.