Home बुलढाणा वानखेड ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नाल्यांतील गाळ, रस्त्यांवरील दुर्गंधी आणि नागरिकांच्या समस्या कायम...

वानखेड ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नाल्यांतील गाळ, रस्त्यांवरील दुर्गंधी आणि नागरिकांच्या समस्या कायम ! स्वच्छ भारत मिशन कागदावरच? गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर..

96

आशाताई बच्छाव

1001541544.jpg

वानखेड ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नाल्यांतील गाळ, रस्त्यांवरील दुर्गंधी आणि नागरिकांच्या समस्या कायम ! स्वच्छ भारत मिशन कागदावरच? गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या वानखेडमध्ये सध्या स्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. नाल्यांमधील गाळ उपसण्याकडे दुर्लक्ष, रस्त्यांवर वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी आणि वीज, आरोग्य व पाण्यासारख्या मूलभूत सुविधांतील त्रासांमुळे गावकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. स्वच्छ भारत मिशनचा ‘रेकॉर्ड’
व्यवस्थित, पण कामाचा अभाव अशी परिस्थिती आहे.गावात स्वच्छतेसंदर्भात वेळोवेळी मोहीमा राबवण्याऐवजी फक्त कागदोपत्री रेकॉर्ड भरले जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. मान्सूनच्या तोंडावर अनेक नाल्यांमधील गाळ अजूनही तसाच आहे, तर काही ठिकाणी नाल्यांचीच व्यवस्था नाही. परिणामी, पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे जगदंबा मंदिर परिसरातही दुर्गंधीय
पाणी साचले…
गावातील तीर्थक्षेत्र जगदंबा माता मंदिर गावातील तीर्थक्षेत्र जगदंबा माता मंदिर परिसरातही पाणी साचलेले असून, दुर्गंधी आणि विषारी प्राण्यांचा धोका वाढला आहे. नाल्यांमध्ये गाळ काढण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, हे वास्तव ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे बोट दाखवत आहे. गावात अनेक वेळा रस्ते, अतिक्रमण, स्वच्छता या संदर्भात तोंडी तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा विचार सुरू केला आहे.वानखेड ग्रामपंचायतीकडून नियमित लक्ष असल्याचे सांगण्यात येत असले तरीरी असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कृतीचा अभाव जाणवतो. त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आता तरी जागे होऊन स्वच्छता, आरोग्य, वीज व पाणीपुरवठा यासारख्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Previous articleदेऊळघाटात अवैध दारू विक्री बंद होईना ! – एकाचे उपोषण सुरू !
Next articleरेती माफीयांची अनोखी शक्कल, पावसामुळे चिखल झाला म्हणून चक्क गाढवाहून रेतीची वाहतूक…….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.