Yuva maratha news
मोठ्ठी बातमी! १ जुन पासून मिळणार रेशनकार्ड धारकांना १०००/- रुपये महिना…
मुंबई:- शासनाने रेशनकार्ड धारकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली असून, फक्त रेशन देणे एवढाच शासनाचा उद्देश नसून येत्या एक जुन पासून रेशनकार्ड धारकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार असून, त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज पुढीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करून करता येणार आहे.१) रेशनकार्ड २) आधारकार्ड ३) बँक पासबुक ४) उत्पन्न दाखला ५) अर्ज या पध्दतीने अर्ज करता येऊ शकतो त्यासाठी शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती जाणून घ्यावी.






