Home जळगाव रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही…

रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही…

245

आशाताई बच्छाव

1001542432.jpg

रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही…                                                   चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील 

चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्को च्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन च्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती मला मिळाली. तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून ४ तास ठिय्या दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले १ लाख २० हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही.

या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे.

माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो.

– आमदार मंगेश रमेश चव्हाण

Previous articleमोठ्ठी बातमी! १ जुन पासून मिळणार रेशनकार्ड धारकांना १०००/- रुपये महिना…
Next articleचाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी येणार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.