आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
शेवरेत आदिवासी जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न ताहराबाद,(शांताराम देवरे प्रतिनिधी)– सटाणा तालुक्यातल्या शेवरे गावी आदिवासी जनजागृती मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आलेले होते,मेळाव्यातून विविध कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडले. मालेगांव येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज या संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केलेले होते.शेवरे गावात या मेळाव्यातून आदिवासी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविण्यात आले.दिनांक १० मे रोजी प्रातकाळी गावातून मशाल जनजागृती रँली महिलांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून काढण्यात आली.राष्ट्रीय विषयावरील घोषणाबाजीने हा परिसर दुमदुमून गेला होता.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच,त्यांचे संस्थेच्या वतीने अध्यक्ष सिध्दार्थ पानपाटील यांनी आदरतिथ्य व स्वागत केले,प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धाचे अनावरण नाणेफेक करुन करण्यात आले.यावेळी खो -खो ,व कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते.बचत गटांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बनविलेल्या वस्तुंचे भरविण्यात आलेले प्रदर्शन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.यावेळी उमेदचे सचिन चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,बचत गटासाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती यथायोग्य व परिपूर्ण स्वरुपात दिली.तर बागलाणचे गटविकास अधिकारी पांडूरंग कोल्हे यांनी पंचायत समितीकडून आदिवासी बांधवाना शबरी माता घरकुल योजना,पंतप्रधान आवास योजना तसेच पाळीव जनावरेंच्या गोठयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तर नाशिकच्या हरिओम उद्योग समूहाचे सीईओ नंदकिशोर देवरे यांनी आदिवासी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले की,स्कील डेव्हलपमेंट व रोजगार निर्मितीसाठी आम्ही तुमच्यासोबत कटीबध्द आहोत.तर हरिओम उद्योग समूहाचे मालक सुरेंद्रकुमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,शेवरे गावातील आदिवासी बचत गटाच्या महिलांना सोबत घेऊन मोठया रोजगार निर्मितीचे बीज आपल्या गावातूनच लावले जाईल की ,भविष्यकाळात प्रत्येक महिला आत्मनिर्भर बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी स्पर्धामध्ये विजेत्यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.शेवटी बालविवाह न करण्याबाबतची शपथ युनिसेफचे श्रीकांत सर यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळाव्यातून देण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर सरपंच दादाजी बागुल,ग्रामसेविका सुरेखा बच्छाव,बेबी देसाई,दिपाली घरटे,रत्ना भामरे,वैशाली चव्हाण,अंतापूरचे माजी सरपंच सुनिल गवळी,सरपंच सौ.रेखा साबळे,आदी बहुसंख्येने उपस्थित होते.हा मेळावा व्यशस्वीतेसाठी चंद्रशेखर वाघमारे ,महेंद्र पवार, श्रीकांत भोरे,गुलाब पवार,सरला पवार ,काळू बागूल,योगेश गवळी,शरद बागूल,पंडीत बागूल,एकच नाद बैलगाडा संघटना आदीनी विशेष परिश्रम घेतले.तर मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.