Home नाशिक महिला पोलिसांचा असाही प्रामाणिकपणा–

महिला पोलिसांचा असाही प्रामाणिकपणा–

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20230509-WA0025.jpg

महिला पोलिसांचा असाही प्रामाणिकपणा–

सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या महिलेची सोनसाखळी महिला पोलीसांकडून प्रामाणिकपणे परत–

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या नंदिनी राहुल शिंदे, छत्रपती संभाजी नगर यांची चोरट्याने पळवलेली सोनसाखळी महिला पोलीस नाईक वर्षा निकम यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सप्तश्रृंगी गडावर उन्हाळी सुट्टी मुळे भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत असल्याने याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवार दि.९ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील नंदिनी राहुल शिंदे या नातेवाईकांसोबत दर्शनासाठी आल्या होत्या. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सप्तशृंगी गडावरील रोपवे ट्रॉली परिसरात त्यांची अंदाजे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबवली. याकाळात वातावरण तंग झाल्याने चोरट्याने सोनसाखळी रोपवेच्या कोपऱ्यात टाकून पळ काढला. गळ्यातील चेन गहाळ झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी तेथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस नाईक १३८८ वर्षा निकम यांचेकडे धाव घेतली. त्यानंतर तातडीने कार्यवाही करत पो.नाईक वर्षा निकम यांनी cctv तपासणी करून सोनसाखळी नंदिनी शिंदे हिची असल्याची खात्री पटवत तिला (नंदिनी) परत केली.

● सोनसाखळी गहाळ होताच मी पुरते घाबरून गेले. मात्र समोर महिला पोलीस दिसल्याने आधार वाटला व मी त्यांना हकीकत सांगितली. त्यांनी तातडीने कार्यवाही करत सोनसाखळी सापडून परत केली त्याबद्दल त्यांचे आभार.

नंदिनी राहुल शिंदे–छत्रपती संभाजीनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here