Home नाशिक ” बुद्धम् शरणम् गच्छामि ” अडीच हजार वर्षांनंतर बुद्धांच्या अस्थींचे दर्शन :...

” बुद्धम् शरणम् गच्छामि ” अडीच हजार वर्षांनंतर बुद्धांच्या अस्थींचे दर्शन : नाशिककर भारावले

44
0

मुंबई : ( विजय पवार )

अडीच हजार वर्षांनंतर थायलंड येथून भारतात आलेल्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन नाशिककर कृतकृत्य झाले. ‘धन्य जाहले जीवन’ अशी भावना तमाम नाशिककरांनी व्यक्त केली.गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील परभणी येथील बौद्ध धम्म पदयात्रा फिरत आहे. आज ही पदयात्रा नाशिक शहरात दाखल झाल्याने महाकारुणी तथागतांच्या अस्थींचे दर्शन मिळावे अशी उपासकांची इच्छा पूर्ण झाली.

बुद्धांच्या अस्थी कलशाचे मंगला आगमनाने सोबत थायलंडच्या भिक्खू संघाचे पदयात्रा नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी रांगा पाहायला मिळाल्या.बुद्ध स्मारकात दर्शनासाठी जनसागर उसळला आणि हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लिन झाले. अडीच हजार वर्षानंतर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींच्या दर्शनाचा लाभ भारतीयांना झाला.

थायलंड येथून निघालेला अस्थीकलश रथ आणि भंतेजींची पदयात्रा भारतातील विविध राज्यांत भ्रमण करत महाराष्ट्रात दाखल झाले असून सोमवारी यात्रेचे नाशिकमध्ये आगमन झाले.थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खू, भारतातील भिक्खू आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन १७ जानेवारीला परभणी येथून निघालेली ही असती कलश धम्मयात्रा नाशकात दाखल झाली.

नाशिक शहरातील वडाळा गाव इंदिरानगर ते बुद्ध लेणी दरम्यान संपूर्ण रस्त्यावर रांगोळीसह फुलांचा वर्षाव करत नाशिककरांकडून जागोजागी धम्म पदयात्रेचे धम्म उपासकांनी अभूतपूर्व स्वागत केले.’बुद्धम् सरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संघम शरणम् गच्छामिच्या घोषाने वातावरण मंगलमय झाले. उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत सकाळपासून अस्थीकलश आणि पदयात्रेचे दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Previous articleपत्रकारांवरील बेकायदा गुन्हे दाखल केलेले तात्काळ रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू : वसंत मुंडे
Next articleजय हिंद विद्यालय कासुर्डी यांची माजी विद्यार्थ्यास आर्थिक मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here