Home गडचिरोली आष्टी, एटापल्ली, आलापल्ली व सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे दुरवस्थेसाठी भाजप सरकार जबाबदार –...

आष्टी, एटापल्ली, आलापल्ली व सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे दुरवस्थेसाठी भाजप सरकार जबाबदार – माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0026.jpg

आष्टी, एटापल्ली, आलापल्ली व सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे दुरवस्थेसाठी भाजप सरकार जबाबदार – माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी                            गडचिरोली,(सुरज गुंडमवार)

आष्टी ते एटापल्ली, आलापल्ली ते सिरोंचा हे पुर्वी राज्य महामार्ग म्हणुन 2014 पुर्वी सुस्थितीत होते. परंतु 2014 नंतर केंद्रसरकारने या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समाविष्ट केले. या मार्गावर आंतरराष्ट्रीय राज्यातुन जड वाहनाची प्रचंड ये-जा असते, तसेच सुरजागड प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध असतांनाही पैशाच्या हव्यासापोटी व सुरजागड उद्योग समुहाला लाभ पोहविण्यासाठी मोठया प्रमाणात उत्खनन करुन सुरजागड येथील लोह खनिज इतर जिल्हयामध्ये नेण्याचा सपाटा सरु केलेला आहे. या उत्खनन व वाहतुकीवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश नाही. एका ट्रकमध्ये किती लोहखनिज नेण्यात येत आहे. यासाठी कुठेही धर्म काटयाच्या माध्यमातुन मोजमाप करण्यात येत नाही व किती ट्रकाव्दारे मालवाहतुक व लोहवाहतुकीचे प्रशासनाकडे नोंदणी ही नाहीत, जणुकाही उद्योग समुहाला बेधुंद लुटमार करण्याची मुबा केंद्र व राज्य सरकारातील प्रशासनांनी दिलेली आहे की काय? अशी शंका उपस्थित होते. वास्तविक पाहता, या महामार्गाचे नव्याने बांधणी करण्याचे नियोजन केली असल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात येते. परंतु मागील तीन वर्षापासुन कामाला सुरवात झालेली नाही. केंद्रातील पंतप्रधान व केंद्रीय वाहतुक मंत्री हे कार्यक्षम असल्याचा दावा भाजपाचे नेते करीत असतात. या भागात भाजपाचे खासदार असतांना सुध्दा हे काम रखडलेले असल्याने भाजप खासदार निष्क्रीय आहेत किंवा केंद्रावर दबाब आणण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहेत. यापुर्वी राज्यमहामार्ग असल्याने किरकोळ दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडे निधी असायचा, परंतु जेव्हापासून हे महामार्ग केंद्र सरकारने हंस्तातरीत केलेले आहे, तेव्हापासुन केंद्राकडून किरकोळ दुरुस्तीसाठी निधी दिल्या जात नाही. त्यामुळे जनतेचे अच्छे दिन तर सोडा बुरे दिन सुरु झालेले आहेत. स्वातंत्र्य पुर्व काळात सुध्दा जनतेला सिरोंचाला जाण्यासाठी तेलगांना राज्यातुन जावे लागत नव्हते, परंतु केंद्र सरकारने गडचिरोली जिल्हयातील लोकांना पुन्हा स्वातंत्र्यपुर्व काळात नेवून ठेवले. याबाबीची गंभीर दखल घेवून केंद्र सरकारने रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरु करावे किंवा सुरजागड उद्योग समुहाकडून निधीची मागणी करुन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यावेळी काॅग्रेस पदाधिका-यांनी आष्टी ते एटापल्ली, आलापल्ली ते सिरोंचा रोडची पाहणी केली असता काॅग्रेस पक्षातर्फे तिव्र रस्ता रोको आंदोलन करुन सुरजागड प्रकल्पातील एकही ट्रक जावू देणार नाही.

Previous articleपहिली स्वदेशी INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल
Next articleग्रामविकास अधिकारी विक्रमपुर यांची तात्काळ बदली करा आमदार डॉ देवरावजी होळी यांना विक्रमपुर ग्रामवासियांचे निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here