Home मुंबई सुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी.

सुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी.

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20230207-WA0009.jpg

सुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी.

मुंबई: ( विजय पवार )
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत गेल्या दहा वर्षांत तब्बल १७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘एडीआर’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या हवाल्याने असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ हा अहवाल तयार केला आहे.

सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या ७१ लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत २८६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. यात भाजपचे ४३, काँग्रेसचे १०, तृणमूल काँग्रेसचे ७, बीजेडी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी २, तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या १-१ खासदाराचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

यासंदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा अहवाल खोटा आहे. माझ्या संपत्तीमध्ये वाढ झालेली नाही. तुम्ही माझ्या संपत्तीची कागदपत्रे तपासून पाहा. ही माहिती खोटी असल्याचे तुमच्या ध्यानात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Previous articleवंदे भारत सज्ज…! मुंबई ते शिर्डी प्रवास ५ तास ५५ मिनिटात.
Next articleबाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन नाशिकमधील जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात दाखल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here