• Home
  • देगलूर पोलिसांची धाडसी कामगिरी. खुनाच्या गुन्ह्याचा लावला छडा.

देगलूर पोलिसांची धाडसी कामगिरी. खुनाच्या गुन्ह्याचा लावला छडा.

आशाताई बच्छाव

IMG-20230128-WA0055.jpg

देगलूर पोलिसांची धाडसी कामगिरी. खुनाच्या गुन्ह्याचा लावला छडा.                                                     मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
 देगलूर – पोलीस ठाणे देगलूर येथे दिनांक २४-१-२०२३ रोजी फिर्यादी नामे श्रीपतराव रामजी पाटील वय ९० वर्ष व्यवसाय वयोवृद्ध रा. लालबहादूर शास्त्रीनगर उदगीर रोड देगलूर यांनी दिनांक २४-१-२०२३ रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे तक्रार दिली की दिनांक २३-१-२०२३ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्यासह घरी झोपलेले असताना अंदाजे २० ते ३० वर्ष वयाचे तीन अनोळखी इसमानी घरात येऊन श्रीपतराव पाटील यांचे पाय कपड्याने बांधून व त्यांची पत्नी चंद्रकलाबाई यांचे पाय व तोंड कपड्याने बांधून खून करून घरातील १)मयताच्या अंगावरील सोन्याचे मनी मंगळसूत्र १० ग्रॅम वजनाचे, सोन्याची बोरमाळ १५ ग्रॅम वजनाची, हातातील सोन्याच्या पाटल्या ५० ग्रॅम, कपाटातील सोन्याची कडे ५० ग्रॅम, चांदीचे ७० तोळ्याचे वाळे असे सोन्या चांदीचे दागिने ३ लाख ८९ हजार रुपयाचे दागिने जबरीने चोरून नेले आहेत. सदरील तक्रारीवरून पोलीस स्टेशन देगलूर येथे गु.र.न. 39/2023 कलम 302, 397, 34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेणे कामी मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सचिन सांगळे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलूर यांच्या नेतृत्वात १) पोलीस निरीक्षक सोहन माछरे पोलीस स्टेशन देगलूर, सपोनी आनंद माळाळे, सपोनी संगमनाथ परगेवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, रवी मुंढे, पुनम सूर्यवंशी, कांबळे, सपोउपनि मिरदोडे, पोहेकॉ. कणकवले, इंगोले, जोगे, कासिम, जावेद शेख, पोना सुनील पत्रे, तलवारे, पोकॉ. मलदोडे, यमलवाड, मोरे, घुळे, शिंदे, मोटरगे, बेग, सोनेकर, जगताप, नागमवाड ड्रायव्हर महाजन २) स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक श्री द्वारकादास चिखलीकर, सपोनी माने, पो. उपनिरीक्षक बोराटे, पोहेकॉ. मुंडे ,करले ३) पोलीस स्टेशन मुखेड येथील पोलीस निरीक्षक श्री विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक भारत जाधव, व पथक ४) पोलीस स्टेशन मरखेल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मद्दे, पो.हे.कॉ. बारी, पोलीस कॉ. यंगाले ५) पोलीस स्टेशन मुक्रमाबाद पोलीस उपनिरीक्षक श्री वाघमारे, कागणे,पो.ना. मरगेवार, शिंदे अशी शोध पथके तयार करण्यात आली होती. सदरील पथकाने देगलूर, मरखेल, करडखेड,मुक्रामाबाद तसेच कर्नाटक राज्यातील वडगाव, औराद, संतपूर येथील जवळपास ९६ तासाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबीचे विश्लेषण केले. पथकांना पोलीस निरीक्षक श्री नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री दळवी, पोलीस हेकॉ.ओढणे, सिटीकर सायबर पोलीस स्टेशन यांनी महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य पुरविले.
पोलीस उपनिरीक्षक श्री रवी मुंढे, मोरे व पोना सुनील पत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपीताची ओळख पटवून गुन्ह्यात सहभागी असणारे गुन्हेगार निष्पन्न केले आहे.
मयत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्याबाबत त्यांचा भाचा शहाजी मरतळे याने अन्य आरोपीताना माहिती दिली. त्यानंतर आरोपीतानी कट करून गुन्ह्याचे नियोजन करून घराची रेखी करून मयत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांचा खून करून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल जबरीने चोरून घेऊन गेल्याचे कबूल केले आहे. सदरील गुन्ह्यात आरोपी नामे १) विठ्ठल व्यंकट बोईनवाड रा. वसूर ता.मुखेड जिल्हा नांदेड २) बालाजी पंढरी सोनकांबळे रा. मंग्याळ तालुका मुखेड ३) गौतम दशरथ शिंदे रा. वसुर तालुका मुखेड ४) शेषराव माधवराव बोईनवाड रा. वसूर तालुका मुखेड ५) शहाजी श्रीराम मोरतळे रा. मोरतळवाडी तालुका उदगीर यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. सचिन सांगळे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे हे करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment