Home कोकण दापोली एसटी आगारातील चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर 🛑

दापोली एसटी आगारातील चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर 🛑

311
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दापोली एसटी आगारातील चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर 🛑
✍️ दापोली : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

दाभोळ ( रत्‍नागिरी ) : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे आज चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले.

आज दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती शिवशाही बस प्रवाशांसह घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले, मात्र हा प्रकार दापोली बस स्थानकात चर्चेचा विषय ठरला .

चालक अशोक वनवे हे मुळचे बीड येथील असून ते नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे तुर्तास कोकणात एसटी सेवा सुरळीत आहे मात्र आता दापोली या प्रकारामुळे दापोलीत आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

दापोली एसटी आगारातीलचालक अशोक वनवे यांनी सांगितले की,आपल्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा असे सांगितले कामावर न आल्यास मेमो मिळेल ही भिती होती.आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही अवघ्या १३ हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे हा प्रश्न आमच्या समोर आहे. एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा असे वनवे म्हणाले. आमच्या मागण्याना आता आश्वासने नकोत तर आमचे दुःख समजुन घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा अशी प्रतिक्रिया त्यानी व्यक्त केली आहे.

यावेळी प्रवासी डॉ. प्रसाद करमरकर यांनीही एसटी कर्मचार्यांची ड्युटी ही जोखमीची व त्रासदायक असते व ती ते चोखपणे पार पाडतात त्यामुळे एसटी कर्मचारी यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ⭕

Previous articleरत्नागिरीत होणार मुंबई विद्यापीठ ‘क्रीडा’ मंडळाची स्थापना 🛑
Next articleरिक्षा चालक काकांचा प्रामाणिकपणा. MH-48-N-7175 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here