Home कोकण रत्नागिरीत होणार मुंबई विद्यापीठ ‘क्रीडा’ मंडळाची स्थापना 🛑

रत्नागिरीत होणार मुंबई विद्यापीठ ‘क्रीडा’ मंडळाची स्थापना 🛑

186
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रत्नागिरीत होणार मुंबई विद्यापीठ ‘क्रीडा’ मंडळाची स्थापना 🛑
✍️ रत्नागिरी : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ क्रीडा मंडळाची स्थापना, मुंबई विद्यापीठातर्फे आंतरमहाविद्यालयीन व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांकरिता भरघोस अनुदानाच्या तरतुदीस मंजुरी तसेच मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व कोकण विभागांची निर्मितीची घोषणा मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मोहन आमुळे यांनी केल्या.

मुंबई विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झालेल्या कार्यशाळेत या घोषणा करण्यात आल्या.

कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा संचालक उपस्थित होते. विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने खेळ व स्पर्धा यांची नियमावली, विभागांची बदललेली रचना व क्रीडा संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी सर्व महाविद्यालये व संस्थांचे क्रीडा संचालक, क्रीडाशिक्षक आणि क्रीडा विभागप्रमुख यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेतली. प्रास्ताविक गोगटे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांनी केले.

कार्यशाळा आयोजनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, र. ए. सोसायटीचे जिमखाना सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, सेवक, जिमखाना विभागातील सर्व सहकाऱ्यांचे योगदान लाभले. प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. क्रीडा स्पर्धांचा प्रसारासाठी.. विद्यार्थ्यांच्या खेळातील प्रगतीसाठी व क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी व विद्यापीठअंतर्गत तळागाळातील महाविद्यालयांपर्यंत क्रीडा स्पर्धांचा प्रसार करण्यासाठी सर्व विभागांच्या पाठीशी मुंबई विद्यापीठ आणि क्रीडा विभाग खंभीरपणे उभे राहण्याची मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे ग्वाही दिली.

स्पर्धेचा आर्थिक भार, प्रवासाचा त्रास कमी.. संचालक डॉ. मोहन आमुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम- २०१६ कलम ५८ नुसार क्रीडा संस्कृतीच्या प्रचलनासाठी आणि खेळांशी संबंधित उपक्रमांकडे लक्ष देण्यासाठी खेळाडूंना विद्यापीठांच्या स्थानिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होता आले पाहिजे तसेच स्पर्धेचा आर्थिक भार व प्रवासाचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सर्व आंतरमहाविद्यालयीन वरील चार विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

या विभागांमध्ये निर्माण झालेली व्यवस्था, क्रीडा स्पर्धांच्या प्रसारासाठी व खेळांच्या, विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्यांच्या विकासासाठी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांच्या बजेटमध्ये भरघोस वाढ करण्यात आल्याचे सांगितले.⭕

Previous articleचिपळूणातील एस.टी. सेवा ठप्प
Next articleदापोली एसटी आगारातील चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here