राजेंद्र पाटील राऊत
चिपळूणातील एस.टी. सेवा ठप्प
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ०९ नोव्हेंबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे
चिपळूण : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण एस.टी.कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने अखेर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून येथील एस.टी. सेवा ठप्प झाली आणि चिपळूण एस.टी. आगाराच्या कारभार थंडावला. अचानक झालेल्या या संपाने अनेक प्रवासी येथील मध्यवर्ती बसस्थानकात तसेच शिवाजीनगर बस स्थानकात खोळंबून राहिले. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक प्रवासी एस. टी. स्थानकात ताटकळले होते. एसटी कामगारांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संप पुकारण्यात आला आहे.




