Home नाशिक नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर !

नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर !

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230125-WA0057.jpg

नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर !

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

पोलीस खात्यासाठी एक गौरवाची बातमी समोर येत आहे. नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राजाराम कडनोर यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील आणखी ७३ पोलिसांना पदक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांचे कामगिरीचे कौतुक करून सत्कार केला आहे.
राष्ट्रपती पोलीस पदकांची काल बुधवार (दि. २५) घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यात नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राजाराम कडनोर यांना देखील राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. कडनोर यांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापुर्ण सेवेची केंद्रशासनाने दखल घेवून दि. 26 जानेवारी 2023 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांचे कामगिरीचे कौतुक करून सत्कार केला आहे.
ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून
पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. आज प्रजासत्ताक दिनी शाहू स्टेडियमवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पदक देऊन
गौरवण्यात येणार आहे.

Previous articleपालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण !
Next articleजिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here