Home Breaking News 🛑 कोरोना उपचारविना बरा होणारा किरकोळ आजार….! झेडपी सभापतींनी स्वतःचा अनुभव सांगितला...

🛑 कोरोना उपचारविना बरा होणारा किरकोळ आजार….! झेडपी सभापतींनी स्वतःचा अनुभव सांगितला 🛑

89
0

🛑 कोरोना उपचारविना बरा होणारा किरकोळ आजार….! झेडपी सभापतींनी स्वतःचा अनुभव सांगितला 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोना हा तर सर्दी, ताप आणि हिवताप या आजारांपेक्षाही खूपच किरकोळ आजार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात दाखल होण्याची आवश्यकता नाही. कोरोना हा उपचाराविना घरच्या घरी बरा होणारा आजार आहे, असे कोरोनावर नुकताच विजय मिळविलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती पूजा पारगे सांगत होत्या.

या आजाराबाबतची ही काही ऐकीव माहिती नसून स्वत: घेतलेला अनुभव असल्याचेही सभापती पारगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पारगे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सहा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये पती, मुलासह अन्य तिघांचा समावेश होता. या सर्वांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल न होता, त्यांच्या फार्म हाऊसवर स्वत:ला क्वराटांइन करून घेतले होते. हे सर्वजण नुकतेच कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.

पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असतानाच, शहरालगत असलेल्या गावांनाही याची मोठी झळ बसू लागली होती. पारगे यांचे डोणजे हे गाव शहरालगतच आहे. या गावात कोरोना हळूहळू पाय पसरत असतानाच १६ जुलै रोजी त्यांच्या पतीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामुळे सभापती पारगे यांनी स्वत:सह कुटुंबातील सर्वच व्यक्तींची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यात त्यांच्यासह सहा जण कोरोनाबाधित आढळून आले होते.

पारगे म्हणाल्या, “कोरोनाचे निदान झाल्यानंतर सर्वांनाच एक वेळा ताप आला. डोके दुखायला लागले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने केवळ ताप आणि डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्या. मात्र पहिले चार दिवस प्रचंड घाम येत असे. यावर उपाययोजना करण्यासाठी फळांचा रस, फलाहार, दूध आणि अंडी यासारखा सकस आहार घेतला. या आहारामुळे पाचव्या दिवसांपासून आम्ही सर्वजण पूर्ववत बरे झालो. यामुळे सहाव्या दिवशी पुन्हा सर्वांच्या कोरोना टेस्ट घेतल्या. या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या.”

कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही त्यापुढील १४ दिवस आम्ही सर्वजण होम क्वॉरंटाइन राहिलो. हा १४ दिवसांचा कालावधी ४ ऑगष्टला संपला असून ५ ऑगष्टपासून नियमित कामकाज सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले…⭕

Previous article🛑 दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक ” मुरलीधर शिंगोटे ” यांचे निधन…..! युवा मराठा न्युजची भावपूर्ण श्रध्दांजली🛑
Next article🛑 राज्यात रामाला विरोध….! यापेक्षा वेगळी मोगलाई काय…??? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here