Home बुलढाणा अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतूक कारवाई ट्रॅक्टर जप्त!

अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतूक कारवाई ट्रॅक्टर जप्त!

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0023.jpg

अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतूक कारवाई ट्रॅक्टर जप्त!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

संग्रामपूर- तालुक्यातील वडगाव वान शिवारातील वान नदीपात्रात अवैध्यरित्या गौण खनिज उत्खनन चालू असल्याच्या माहितीवरून महसूल विभागाच्या अवैद्य गौण खनिज नियंत्रण पथकाने धाड टाकली असता दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान वळगाव वान नदीपात्रात अवैद्यरित्या रेती वाहतूक करतांना एक ब्रास रेती घेऊन जाणारे ट्रॅक्टर पकडले वाहन चालकास रॉयल्टी विचारली असता त्यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्याने अवैद्य उत्खनन चालू असल्याचे समजले त्यावर सदरचे वाहन ताब्यात घेऊन जप्त करून पंचनामा करण्यात आला व वाहन पोलीस स्टेशन तामगाव येथे लावण्यात आले तसेच पुढील कार्यवाई करिता तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात आले. सदरची कार्यवाही तहसीलदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे, बावनबीर मंडल अधिकारी रवींद्र बोराखडे, व तलाठी देवेंद्र बोडखे, डाबरे, सुदेवाड, खरे, कुसळकर आणि कोतवाल अस्वार यांच्या पथकाने रेती माफीयांच्या मुसक्या आवरण्यास सुरुवात केली.
परंतु इतरत्र तालुक्यात विशेष म्हणजे तालुक्यातील धामणगाव, पळशी, करमोळा, व संग्रामपूर सारख्या ठिकाणी रात्रंदिवस अवैध्य रेती वाहतूक चालू असते परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. कारण डोळे असून आंधळे अशातला काहीसा प्रकार दिसून येते म्हणजेच अधिकाऱ्यांच्या समोरून वाहन जाते परंतु न पाहिल्यासारखे सोंग हे संबंधित अधिकारी व कर्मचारी करतांना दिसून येतात असे प्रकार पाहावयास मिळत असल्याने हे मात्र तालुक्यातील नागरिकांपुढे संशयाचा विषय ठरत आहेत. आणि काही अधिकाऱ्यांच्या तोंडून असे सुद्धा बोलल्या जात आहे की आपण कार्यवाही करून रेतीमाफीयांसोबत दुश्मनी घ्यायची आणि वाहन नंतर सोयीस्करपणे सोडून देण्यात येते. त्यामुळे संग्रामपूर तालुक्याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येते.

Previous articleबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किसान सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
Next articleशेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कसमादे विभाग भव्य डाळिंब शेतकरी मेळावा…….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here