आशाताई बच्छाव
दुधात भेसळ करण्यासाठीचे रसायन तिघांकडून जप्त.
युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चीफ biro ज्ञानेश्वर निकम
पंढरपूर, दुधामध्ये भेसळ करण्यासाठी बारामती येथून 14 कॅनमध्ये रसायन घेऊन जाणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी निलेश बाळासाहेब भोईटे(रा. टाकुळी, ता. पंढरपूर)या परमेश्वर सिद्धेश्वर काळे( रा फुलचिचोली ता.पंढरपुर) व गणेश हनुमंत गाडेकर (रा.गणेश नर्सरीजवळ पंढरपूर)या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार नवनाथ सावंत हे सोमवारी मध्यरात्री एक वाजता गस्त घालत असताना वाकरी गुरसाळे ब्रह्मा वळण येथील उड्डाणपूलनजीक दोन संशयित वाहने जाताना आढळून आली. सावंत यांनी तपासणी केली असता त्यापैकी एक का टाटा टेम्पोमध्ये 19 रिकामी कॅन होते तर दुसऱ्या टेम्पोमध्ये 14 कॅन मध्ये पांढऱ्या रंगाचे रसायन आढळून आले. याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर 14 कॅनमधील रसायन हे दुधात मिसळण्यासाठी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सुमित मेहता यांच्याकडून आणले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सदर रसायनाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.