आशाताई बच्छाव
नोटबंदी, चुकिच्या पद्धतीनं लावलेली जी.एस. टी., सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण हे अर्थव्यवस्था डबघाईस आणण्यास कारणीभूत- डॅा. एन.डी. किरसान गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव डॅा. नामदेव किरसान यांनी मौजा पिंपळगांव (भोसले) ता. ब्रम्हपुरी येथे “हेच का माझं बाळ” या नाटकाच्या व “न्यु लावण्य” या लावणीच्या प्रयोगाचे उदघाटन वेळी अध्यक्षीय भाषण करतांना देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आणण्यास केन्द्रातील भा.ज.प. सरकार दोषी असलेयाचे स्पष्ट केले. नोटबंदीमुळे आतंकवाद कमी झाला नाही, नकली नोटांचा सुळसुळाट कमी झाला नाही, काळा घन हि संपुष्टात आला नाही याउलट या सगळ्यात वाढ झालेली आहे व असंघटीत क्षेत्रातील छोटे उधोगधंदे व्यापार बंद होऊन बेरोजगारीत वाढ झालेली आहे. चुकिच्या जी.एस.टी. मुळे छोटे व्यापार व्यवसाय डबघाईस आलेले आहेत. खाजगीकरणामुळे बेरोजगारीत वाढ व बहुजनांचे नोकर्यातील प्रतिनिधीत्व समाप्त होण्याच्या मार्गावर आहे असा खुलासा त्यांनी केला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उदघाटक माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, सह उदघाटक मिलींदजी खोब्रागडे, प्रमुख पाहुणे माजी सभापती केशोरावजी भुते, सरपंच सुरेशभाऊ दुनेदार, रजनीकांतजी मोटघरे, उपसरपंच जगदिशभाऊ बनकर, अनंताजी उरकुडे, भगवानजी राऊत, लोकेशभाऊ पावडे, प्रशांत बगमारे, संजयजी राऊत सरपंच तोरगांव, माजी सरपंच हेमंतजी खोब्रागडे, मधुकरजी मेश्राम, विनोदभाऊ वाळके, राजुजी कुथे, तंटामुक्ती अध्यक्ष माधवजी उरकुडे, गुड्डुभाऊ बगमारे, अनिल शेबे, जावेद खान व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थीत होते.