Home नांदेड अंगणवाडी बळकटीकरणासाठी सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

अंगणवाडी बळकटीकरणासाठी सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20221202-WA0028.jpg

अंगणवाडी बळकटीकरणासाठी सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान
– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण जाहीर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका)  :- जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सक्षम होण्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येत आहे. अंगणवाडी दत्तक धोरणातर्गंत कॉर्पोरेट कंपन्या व त्यांचेमार्फत राबविण्यात येणारा सीएसआर कार्यक्रम, अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट, संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यक्ती, कुटूंब, समूह या सर्व घटकांनी या धोरणात सहभाग घेवून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यास इच्छुक घटक अंगणवाडी केंद्रात स्वेच्छेने सुविधा देऊ शकतील. यात भौतीक सुविधा, शैक्षणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणे अथवा दुरुस्ती करुन देणे, प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम, आरोग्य तपासणी व सुविधा, इतर सहाय्य या सुविधाचा समावेश आहे.

अंगणवाडी दत्तक धोरणामध्ये सहभाग घेणाऱ्या इच्छूकांना आदर्श अंगणवाडी योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधाच्या धर्तीवर 1 लाख 50 हजार रुपयाच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. अंगणवाडी केंद्रामध्ये किरकोळ दुरुस्ती व अन्य ऐच्छिक कामांसाठी 50 हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. अंगणवाडी केंद्राना सहाय्य करण्यासाठी इच्छूकांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना comicdsawcadoption@gmail.com या ईमेलवर तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी किंवा तरंग सुपोषित महाराष्ट्राचा 8080809063 किंवा जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. सोनवणे यांचा मो.क्र.8888766444 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

Previous articleसमता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात युवा गटाची कार्यशाळा संपन्न
Next articleसुरेश (नाना) पवार यांची देवठाण येथे डोंगऱ्यादेव कार्यक्रमास भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here