Home नांदेड समता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात युवा गटाची कार्यशाळा संपन्न

समता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात युवा गटाची कार्यशाळा संपन्न

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20221202-WA0026.jpg

समता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात युवा गटाची कार्यशाळा संपन्न
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका)  :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 हा कालावधीत समता पर्व म्हणून साजरा केला जात आहे. समता पर्व च्या निमित्ताने आज स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे याबाबत समाज कल्याण कार्यालयात युवागटांची कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल गचके, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी व प्रकल्पधिकारी सुजाता पोहरे, समतादूत प्रकल्प आणि नांदेड जिल्हयातील अनु.जाती बचत गटाचे प्रतिनिधी व अनु. जातीचे उद्योजक बनु इच्छिणारे युवक युवती हजर होते.

यावेळी स्टँड अप योजनेअंतर्गत अनु.जातीच्या नवउद्योजकांना विविध उद्योग सुरु करण्यासाठी प्रस्ताव कसे सादर करावेत. अचूक प्रस्ताव सादर करण्यासाठी नेमकी कोणकोणत्या बाबींची दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एमसी ईडीकडून सुमारे 32 योजना युवा उद्योजकांसाठी राबविल्या जातात असे एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी विशद केले. अनिल गचके यांनी नवउद्योजकांनी फक्त सबसीडी हे उद्दिष्ठ न ठेवता कल्पक नवउद्योजकांनी त्यांच्या जीवनात यशस्वी होणाच्या उद्देशाने शासन योजनांचा लाभ घ्यावा व स्वत:चे जीवनमान समृध्द करावे असे आवाहन केले.

प्रास्ताविकात समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी युवकांनी आपल्या जीवनाचे नेमके उद्दीष्ट आणि ध्येय निश्चित करावे. उद्योजक बनायचे असेल तर प्रामाणिकपणे चिकाटीने ध्येय पथावर वाटचाल करावी. तसेच युवकांनी आपले व्यक्तीमत्व प्रामाणिक व प्रयत्नवादी ठेवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

स्टँडअप योजनेच्या ऑनलाईन प्रणालीतील जाचक अटी सोप्या करण्याची अपेक्षा श्रीमती सुजाता पोहरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन गजानन पांपटवार तालुका समन्वयक तर आभारप्रदर्शन अधिक्षक राजेश सुरकूटलावार यांनी केले. या कार्यक्रमांस अनेक युवक / युवती बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक पी.जी.खानसोळे, वरिष्ठ लिपीक रविकुमार जाधव, कनिष्ठ लिपीक व्ही.एस. पकाने, डी.आर. दवणे, तालुका समन्वयक आर.एम शेख, सहाय्यक ग्रंथपाल एन.पी.मस्के यांनी परिश्रम घेतले.

Previous articleसंविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या 2 शाखांचे उद्घाटन संपन्न
Next articleअंगणवाडी बळकटीकरणासाठी सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here