Home परभणी समाजकल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त रॅली -पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याकडून रॅलीला...

समाजकल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त रॅली -पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याकडून रॅलीला हिरवी झेंडी

164
0

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0076.jpg

समाजकल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त रॅली
-पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याकडून रॅलीला हिरवी झेंडी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी, दि.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त आज शनिवारी (२६ नोव्हेंबर) रोजी समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी रॅलीला राजगोपालचारी उद्यानात हिरवी झेंडी दाखवली.

महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये आश्रम शाळा दर्गा पारवा, वसंत अनुसूचित जाती जमाती आश्रम शाळा, सैनिकी स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाबाबत जनजागृतीपर घोषणा देत जायकवाडी परिसरातील सामाजिक न्याय भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारी, शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Previous articleराष्ट्रीय अध्यक्ष/मार्गदर्शक- मान. दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत  पदाधिका-यांच्या निवडी           
Next articleमनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here