Home गडचिरोली आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी..!! जि.प.माजी अध्यक्ष...

आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी..!! जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देवून केली मागणी..!!

101
0

आशाताई बच्छाव

IMG-20221111-WA0049.jpg

आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी..!!

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देवून केली मागणी..!!

बोरी ते खमनचेरू येथील शेतकऱ्यांच्या वाहू लागले अश्रू च्या धारा आणि देवरूपी अजयभाऊ ( Ajjubhau ) आले अश्रू पूसण्यास माणसातला माणूस खरा..!!

काल दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने आज पासून शेतीच्या पंचनामेला सुरुवात..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र.353 या तलाठी कार्यालय साजा क्र.9 मधील बोरी,राजपूर प्याच,शिवनीपाठ,या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत,मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येतिल लोहा खनिज उत्खनन करून दररोज हज़ारों ट्रक ये-जा करत असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णत धूळ पसरत असल्याने शेतातील उभे पिक कापूस,धान पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली.यावेळी उपस्तीत गावातील प्रतिस्टित व शेतकरी श्री.शंकर कोडापे सरपंच बोरी,सौ.मीनाताई वेलादी सरपंच राजपूर प्याच,सुरेश गंगाधरीवार माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य,सुरेश आदे,गोपाळ आदे,चंदु मौहूर्ले,बळवंत आदे,नागेश मोहूर्ले,मीना कावळे,रुपेश चांदेकर,सतीश दैदावार,विलास निकेसर,नागेश वेलादी,शंकर पम्पेलवार, शायलू मडावी सरपंच खमनचेरु,प्रभाकर मडावी,मारोती मडावी,नितीन गुंडावार,अजय मडावी,शोभा मडावी,मधुकर वेलादी,शंकर कम्पेलवार, रुपेश चांदेकर,शंकर निकेसार,बापू ठाकरे,रामुलु कुळमेथे,मधुकर वेलादी,जितेंद्र शेंडे,सुरेश आदे,सुरेश निकेसर,नागेश मोहूर्ले,रामभाऊ आदे,गोपाळा आदे,पेंटू अलोने सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते..!!

Previous articleनवेगाव येथील गोसाई मोहल्यात समाज मंदिराची मागणी
Next articleअंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देऊन त्यात मराठी पोषण ट्रक ऍप समाविष्ट करून द्यावे या मागणीसाठी सटाणा तालुक्यात मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here