Home नांदेड मुखेड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडियाची कार्यकारणी जाहीर.

मुखेड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडियाची कार्यकारणी जाहीर.

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20221005-WA0041.jpg

मुखेड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडियाची कार्यकारणी जाहीर.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड -इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या आदेशावरून नांदेड जिल्हाध्यक्ष जैनुद्दीन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुखेड विश्रामगृह येथे दि. 4 ऑक्टोंबर 2022 मंगळवारी एक महत्वपूर्ण बैठक पार पडून त्यात मुखेड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडियाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून मुखेड तालुका अध्यक्ष म्हणून गाव माझा न्युजचे बाबुराव वाघमारे तर तालुका सचिव पदी tv सह्याद्री न्यूजचे विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पुढील कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून बातमीतकचे अजित पवार, सहसचिव पदी कॅमेरामॅन राजू रोडगे, कोषाध्यक्ष म्हणून केशव राठोड तर कार्याध्यक्ष म्हणून शिवाजी सुडके यांची निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्ष व सचिव यांनी बोलताना म्हणाले, की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन च्या माध्यमातून ग्रामीण व शहरातील पत्रकारांना जोडून पत्रकारांच्या अडीअडचणीकडे लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडण्याचे काम करणार असल्याचे सांगितले आहे ‌. तर या कार्यकारणीची प्रस्तावना जिल्हाध्यक्ष जैनुद्दीन पटेल यांनी केली असून यावेळी पत्रकार संघाचे मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजी कोल्हापूर पत्रकार संजय कांबळे दैनिक श्रमिक लोक राज्याचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड पत्रकार सुशील पत्की, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते श्रावण नरबागे अनिल शिरसे मेथीचे सरपंच शिवाजी मेथीकर, शेतकरीपुत्र बालाजी पाटील सांगवीकर रमाकांत पाटील जाहूरकर, प्राध्यापक अविनाश तलवारे, प्राध्यापक किसन पवित्र, आदींनी उपस्थित राहून निवड झालेल्या पत्रकारांचा येथोचित सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल त्यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत*

Previous articleउंद्री (प.दे.)ता.मुखेड नगरीत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
Next articleनिवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणीबाबत विशेष प्रसिध्दी मोहिम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here