Home बुलढाणा शाळकरी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला अर्धांगवायू संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शिक्षण अधिकारी...

शाळकरी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला अर्धांगवायू संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने शिक्षणा पासून वंचित मुले….

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20221006-WA0021.jpg

शाळकरी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला अर्धांगवायू

संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने शिक्षणा पासून वंचित मुले….

युवा मराठा न्युज नेटवर्क प्रतिनिधी -रविन्द्र शिरस्कार

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या सातपुडा परिसरामध्ये रोहिणखिडकी गावातील आदिवासी कुटुंबातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव्य पाहायला मिळत आहे. सन २०१७ रोजी आदिवासी बहुल रोहन खिडकी यांचे पुनर्वसन जवळच तीन किलोमीटर अंतरावर रोहीन खिडकी येथे झाले असुंन गेल्या अनेक वर्षापासून या गावांमध्ये शिक्षणाची कुठलीही दखल न घेतल्याने त्या गावातील १५० पर्यंत मुले – मुली शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव्य समोर आले आहे .त्यामुळे येथील शाळकरी मुलाच्या शिक्षणाला अर्धांगवायू झाला की काय अशी चर्चा परिसरात होत आहे. तसेच मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे या कारणाने येथील मुलाचे भवितव्य अंधारात असल्याचे भासत आहे. अगोदर या गावांमध्ये वर्ग १ ते ५ पर्यंत ची शाळा होती त्या शाळेमध्ये १०० ते १५० विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत होती. व त्या ठिकाणावर पक्की इमारत सुद्धा बांधण्यात आल्याने तिथे शाळा नियमित चालू होती पण हा भाग वन्यजिव अभयारण्याजवळ येत असल्याने सन२०१७ साली
त्या गावाचे पुनर्वसन झाले त्यांच्या गावावर व विद्यार्थ्यांवर कोणाचेही लक्ष नसल्याने ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे .
तरी रोहण खिडकी येथील आदिवासींनी दि. 3ऑक्टोंबर रोजी तहसीलदार तसेच गट-शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या गावामध्ये वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा निर्माण करावी असे निवेदन सादर केले त्याचप्रमाणे दिनांक १७ ऑक्टोंबर पर्यंत आमच्या अर्जाचा विचार न केल्यास आम्ही संग्रामपूर या ठिकाणावर रास्ता रोको किंवा उपोषण अशा प्रकारचे आंदोलन करू याला सर्वस्वी शिक्षण विभाग कारणीभूत असेल असे त्यांच्या निवेदनामध्ये नोंद केली आहे .

निवेदनात सामाजिक कार्यकर्ता सतीश वानखडे, आदिवासी नागरिक छोटू कासोटे ,कमलसिंग
दारसिंबा, रामकृष्ण कासोटे, बिस्मिल्ला खान, रंगुलाल तोटा, सागर जामुनकर ,सुंदरलाल कासोटे ,अजय पवार अनिलदासीमा, अशा प्रकारचे ५० ते ६० आदिवासी बांधव ह्यांच्या सह्या आहेत.

Previous articleभारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे बापु शिंदे यांची निवड
Next articleअवघ्या तासात रेशन कार्ड मिळाल्याने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर समाधान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here