आशाताई बच्छाव
आम्ही नांदगावकर आयोजित पर्यावरण पूरक घरगुती शाडूमाती गणपती व आरास स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न
नांदगाव ( नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे ) गणेशोत्सवात होणारे जल प्रदूषण रोखले जावे व आपले उत्सव परंपरेनुसार पर्यावरणाला बाधा न आणता साजरे करावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सामजिक कार्येकर्ते संजयदादा मोकळ यांनी सामजिक बांधिलकी म्हणून नांदगाव मध्ये पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव साजरे व्हावा यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थापासून सुरवात व्हावी यासाठी त्यांनी आम्ही नांदगावकर ,यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त आयोजित पर्यावरण पूरक घरगुती शाडूमाती गणेश मूर्ती व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच संपन्न झाले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.सुरेश नारायणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून कुदरत अली शहा,समाभाऊ पारख,माजी सरपंच रणजित मंडोडिया,विष्णु बोळीज,भरत मोकळ,
हा कार्यक्रम म.गांधी व लाल बहाद्दूर शास्री यांच्या जयंती चा औचीत्त साधून करण्यात आला होता . प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सुरवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व गणेश मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्याचा परिचय व स्वागत संजय मोकळ यांनी केले प्रास्ताविकेत त्यांनी या स्पर्धे मागचा हेतू सांगून या पर्यावरण पूरक उत्सवात यापुढेही अधिक नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.त्यांतर, जगन्नाथ साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले .रंगनाथ चव्हाण यांनी या स्पर्धेची माहिती सांगून या अशा स्पर्धेसाठी जेष्ठ नागरिक संघ नेहमी पाठीशी असे सांगितले.भरत मोकळ यांनी पर्यावरण पूरक उत्सवाचे महत्व विषद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश नारायणे यांनी या अशा स्पर्धेमुळे नवीन पिढीला पर्यावरण पूरक उत्सवाची सवय लागेल व ज्यांनी हा उपक्रम सुरु केला त्याचे मनापासून कौतुक केले व अशा स्पर्धेतून विद्यार्थांना प्रोत्साहन मिळते असे सांगून बक्षिस पात्र विद्यार्थाचे व सहभागी स्पर्धकाचे अभिनंदन केले.त्यानंतर कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी उपस्थिता समोर गणपती उत्सवानंतर कशा प्रकारे प्रदूषण व देवाची विटंबना होते हे व्हिडीओ क्लिप मार्फत दाखविले .स्पर्धका मधून साई बोळीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साई या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक सुनिल वाघ सर यांनी काम पहिले
या स्पर्धेत विजेत्यांना सन्मान चिन्ह व रोख स्वरूपाचे बक्षिस देण्यात आले.प्रथम क्रमांक मानसी सुनिल सोर ,द्वितीय भाग्यश्री सुनिल वाघ ,तृतीय अर्णव सुमित गुप्ता व उत्तेजनार्थ भूमी किशोर पाटील यांना हे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मा यांनी केले व आभार श्रिया मोकळ यांनी मानले या प्रसंगी जेष्ठ नागरिक , गणेश भक्त उपस्थित होते