Home गडचिरोली स्वयं-रोजगार करण्याचा आदिवासी महिलांचा निर्धार कौतुकास्पद -डॉ. शिलू चिमुरकर यांचे प्रतिपादन

स्वयं-रोजगार करण्याचा आदिवासी महिलांचा निर्धार कौतुकास्पद -डॉ. शिलू चिमुरकर यांचे प्रतिपादन

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0055.jpg

स्वयं-रोजगार करण्याचा आदिवासी महिलांचा निर्धार कौतुकास्पद
-डॉ. शिलू चिमुरकर यांचे प्रतिपादन

दुर्गम, आदिवासी भागातील कुकडी ( विहिरगाव) येथे मोहापासून निर्मित उत्पादन कार्यशाळा

वैरागड आरमोरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सामान्यतः आदिवासी भागातील महिलांचा पारंपरिक एकमेव रोजगार असलेल्या शेतीची कामे करण्याकडे कल असतो मात्र आधुनिक काळात व नवीन तंत्रज्ञानाच्या युगात शेतकामा शिवाय इतर काम/व्यवसाय करणे अत्यावश्यक आहे. कारण हल्लीच्या शेतीत राब-राब दिवस रात्र कष्ट करूनही शेतीच्या उत्पन्नातुन शेतीसाठी केलेला खर्चही निघत नाही. त्यातच दरवर्षी अति पाऊस व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील महिलांनी शेतीवरच अवलंबून न राहता स्वतः रोजगार करून स्वावलंबी बनण्याचा निर्धार केला हा त्यांच्या निर्धार वाखानन्याजोगा असल्याचे प्रतिपादन नागपूरच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ शिलू चिमुरकर यांनी केले.
शकुंतला हेल्थ केअर सोसायटी, आरमोरी व गडचिरोली हर्बल कलस्टर बहुउद्देशीय सहकारी संस्था, पोरला मर्यादित गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहा पासून निर्मित उत्पादन कार्यशाळेत आदिवासी महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
आरमोरी तालुक्यातील कुकडी विहिरगाव येथे आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ महेश कोपुलवार होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून गडचिरोली हर्बल कलस्टर संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ प्रशांत दि. भरणे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ शिलू चिमुरकर तसेच कुकडी च्या तेजस्विनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविताताई किरंगे उपस्थित होत्या.
पुढे बोलताना डॉ चिमुरकर म्हणाल्या आदिवासी भागातील महिला मोहा पासून विविध वस्तू उदा. मोहाचे लाडू, शेव चकल्या यासारख्या वस्तू तयार करतात व त्यांची विक्री करून आपल्या गावाचा नाव जिल्ह्यात पोहचवितात तसेच बचत गटाच्या उत्पन्नात भर टाकतात व आपलाही आर्थिक विकास करतात ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे. या आदिवासी महिलांचा आदर्श इतर गावातील महिलांनी घेऊन स्वयं रोजगार उभारून स्वतःचा आर्थिक विकास साधला असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ महेश कोपुलवार म्हणाले, महिलांचा हा उपक्रम प्रशंसनीय असून याही पुढे जाऊन महिलांनी आपल्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी आपला ब्रँड निर्माण करावा व मुंबई पुणे सारख्या मोठया शहरामध्ये तसेच अन्य जिल्ह्यमध्येही आपण तयार केलेल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करावा यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ प्रशांत भरणे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिला मोहफुलें गोळा करून कुटूंबाच्या उत्पन्नात भर पाडतात तसेच इतरही वनउपज गोळा करून पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याही पुढे जाऊन त्यापासून विविध खाद्य पदार्थ बनविणे व त्याची विक्री करून कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे हा महिलांचा निर्धार गौरवास्पद आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनउपज व वनौषधी आहे त्या-त्या हंगामात ते गोळा करून विक्री केल्यास त्यामधून चांगला नफा मिळविता येऊ शकते त्यामुळे महिलांनी याकडे लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली हर्बल कलस्टर संस्थेचे अमित कालबांधे, राजेंद्र भुरसे, व कुकडी येथील महिलांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleजिनियस स्कूल मध्ये अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन.
Next article!खासदार अशोक भाऊ नेते यांची सांत्वन भेट!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here