राजेंद्र पाटील राऊत
छावणी पोलिसांनी केला कानाडोळा,सट्टा माफीया अशोक वाणी करतो हरामाचा माल गोळा!! मालेगांव तालुक्याच्या सट्टा माफीयात “कही खुशी तो कही गम” तरीही धंद्यात आहेच चांगला जम…!
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________
मालेगांव– नाशिकच्या मालेगांव तालुक्यात सध्या सट्टा माफीयात गमचे (दुःखाचे) वातावरण दिसून येत असले,तरी मालेगांव शहरातील विविध भागात मात्र बिनबोभाटपणे सट्टा मटका जुगार सुरुच आहेत.मागील काही दिवसापूर्वी वडनेर खाकूर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडनेर गावात सुरु असलेल्या सट्टा मटका जुगार अड्डयावर माजी कृषीमंत्री तथा तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादाभाऊ भुसे यांनी छापा टाकून सदरचा जुगार अड्डा नेस्तानाबूत केला खरा; मात्र तेव्हापासून आजतागायत तालुक्यात सट्टामाफीयात गम (दुःखाचे) वातावरण निर्माण झाल्याचे दृश्य बघावयास मिळत आहे.मात्र त्याउलट परिस्थिती मालेगाव शहरात बघावयास मिळत आहे,अगदी वर्दळीच्या ठिकाणी अर्थातच मोसमपूलजवळील सुजन थियटर परिसरात रिक्षामध्ये बसून अवैधरित्या सट्टा मटका जुगाराची बेटींग घेणाऱ्या अशोक वाणीला नेमका आशिर्वाद कुणाचा?असाही प्रश्न सध्या तालुकाभरात चर्चिला जात आहे.छावणी पोलिस देखील या अवैध धंद्याची कोणत्या उद्देशाने पाठराखण करुन कानाडोळा करीत आहेत.त्याशिवाय मालेगावच्या कँम्प भागातल्या शनि मंदिरासमोरच सार्वजनिक शौचालयाजवळ बंडू नामक व्यक्तीही खुलेआम बेटींग घेण्याचे बेकायदेशीर काम करीत असताना कँम्प पोलिसांनाही त्याची भनक लागू नये म्हणजे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादाभाऊ भुसे यांनी या अवैध धंद्याकडेसुध्दा थोडे लक्ष देऊन वाममार्गाला लागणारी युवा पिढी उध्वस्त होण्यापासून वाचवावी अशीच अपेक्षा सर्वसामान्य करीत आहेत.