Home पुणे पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज…… ……ला. प्रदीप कुलकर्णी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पर्यावरण.

पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज…… ……ला. प्रदीप कुलकर्णी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पर्यावरण.

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0056.jpg

पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज…… ……ला. प्रदीप कुलकर्णी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पर्यावरण.
पिंपळे गुरव प्रतिनिधी उमेश पाटील
पिंपळे निलख :- पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे ,स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला पाहिज, प्रदूषण मुक्त भारत या सदराखाली प्रत्येकाने प्लास्टिक बंदी वर ही लक्ष दिले पाहिजे यासाठी संघटित होऊन सर्व नागरिकांनी यावर काम केले तर आपल्या देशातील पर्यावरणाचे रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही असे मत डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन पर्यावरण ला. प्रदीप कुलकर्णी यांनी लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने पिंपळे येथील मिलिटरी मैदानावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने 20 देशी रोपांची लागवड करण्यात आली व तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचे उत्कृष्ट काम केल्या बद्दल डिस्टिक चेअरपर्सन ला. प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी या क्लब ला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्लास्टिक बंदीचा संदेश देत असताना मेटॉलिक बॉटल चे वाटप करण्यात आले व प्लास्टिक वापरू नका असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपळवड संस्थेचे सदस्य अजय पाटुकले, सतीश वगैरे, सुनील वगैरे, मनीष टपरावत, हनुमान लाड ,बळवंत पवार, हनुमान बोराटे, संदीप बोडके, विनोद बोडके, विक्रम चासकर, सुभाष पाठक, दीपक चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी चे अध्यक्ष ला. धीरज कदम, खजिनदार ला.शिवाजी माने, सचिव ला. हेमंत रसाळ, ला. वसंत भाऊ कोकणे, ला. अशोक बनसोडे, ला. प्रमोद भोंडे, ला. विक्रम शक्तावत, ला. गिरीश धांडे, ला. सतिश देवकर, लिओ पार्थ देवकर यांनी स्वतः खड्डे खाणून झाडे लावली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. पिंपळवड या संस्थेला भविष्यातही लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने सहकार्य केले जाईल असे अध्यक्ष ला.धीरज कदम यांनी जाहीर केले.पिंपळवड च्या सर्व सदस्यांनी लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी चे मनापासून आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला.अशोकजी बनसोडे व आभार अध्यक्ष ला धीरज कदम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here