Home नाशिक ताहाराबाद येथे बैलपोळा उत्साहात साजरा.

ताहाराबाद येथे बैलपोळा उत्साहात साजरा.

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0021.jpg

ताहाराबाद येथे बैलपोळा उत्साहात साजरा.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे                             आजच्या आधुनिकरणाच्या युगात सुद्धा बैलपोळा या सणाला महत्त्व काही वेगळेच असते आजच्या दिवस शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांना शेतात कुठलीही कष्टाचं कामे न देता फक्त त्यांचे ऋण फेडावे यासाठी सकाळ पासून हा सन साजरा होतो. हा उत्सव ताहाराबाद शहरात सुद्धा मोठ्या आनंदात साजरा झाला सकाळी बैलांना मस्त धुऊन दुपारी रंगोटी करून बैल जोडी अगदी मोठ्या डौलाने सचवण्यात‌ आल्या होत्या.तसेच सायंकाळी चार वाजता गावात बैलांची मिरवणूक काढून हनुमान मंदिराजवळ प्रदक्षिणा देण्यात आली. संध्याकाळी महिला शेतकरी यांच्याकडून बैल जोडीचे औक्षण करण्यात आले. तसेच बैलांना पुरन पोळीचा गोड घास देण्यात आला. बैलांचे प्रतीक म्हणून मातीच्या बैलांचे महत्त्व काही वेगळेच असते त्यामुळे प्रत्येक घरात मातीच्या बैलांचे सध्दा औक्षण नाही चे करण्यात आले व आपापल्या घरी शेतकऱ्यांनी सुद्धा पुरण पोळीचे गोड पदार्थ बनवुण हा सन साजरा करण्यात आला. ताहाराबाद हे गाव फार लोक वस्तीचे शहर असल्याने बैलांची मिरवणुक दरम्यान गावातील तरुणांकडून विशेष काळजी घेण्यात आली त्यात टायगर ग्रुप व जनता दरबार या ग्रुपचे तरुण अग्रेसर होते.

Previous articleभोकरच्या लामकानीत बैलपोळा उत्साहात साजरा
Next articleपिंगळवाडे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here