आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: महाराष्ट्रात पुण्यापासून मनसेची सभासद नोंदणीला सुरुवात! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषित केले आहे की कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर मनसेचे सभासद नोंदणीला सुरुवात होणार आहे. इथून पाठीमागे सभासद नोंदणी होत असताना ती मुंबई येथून होत होती परंतु आता सभासद नोंदणी पुणे शहरापासून सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा राज ठाकरे यांनी स्वतःचाच सभासद नोंदणीचा फोटो जाहीर करून सभासद नोंदणीला सुरुवात केली आहे. त्यांनी या माध्यमातून माध्यमांना सांगितले आहे की महाराष्ट्रातल्या तरुण मित्रांनी, महिला व सर्वांनी या मोहिमेमध्ये हिंदूंचे रक्षण तसेच महाराष्ट्राची सेवा या योजनेत सहभागी व्हा, देशाला व महाराष्ट्राला बळकटी मिळण्यासाठी काम करा. त्यासाठी मनसेला सभासद नोंदणी मध्ये सहभाग घ्या. यावेळी नोंदी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले की नोंदणी झाल्यानंतर सर्व सभासदांना दर आठवडे मनसेचे कार्यक्रम त्याचबरोबर स्वतः राज ठाकरे यांचे भाषण, इथून पुढच्या काळामध्ये काय काय केले जाणार आहे, पक्षातर्फे याची माहिती दर आठवडी तुमच्या मोबाईल वरती मेसेज द्वारे तुम्हाला पोहोचली जाईल. अशा प्रकारे पुण्यामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदीला सुरू झाली आहे. पुण्यामध्ये स्वतः राज ठाकरे उपस्थित होते तर मुंबईमध्ये सभासद नोंदणीसाठी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या.