Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0039.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान

पोलीस अधिक्षक विजय मगर यांनी तातडीने केली मदत.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नागपूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांना वृद्ध महिलेची घटना समजताच तात्काळ पोलीस अधीक्षक यांना फोन करून सदर वृद्ध महिलेला जीवदान दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, वार्ताहर चंद्रशेखर गुरनुलेरे यांना वनाथ चौरे कॉलेज, बोरुजवाडा येथे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होण्यासाठी जातांना रेवनाथ चौरे कॉलेजच्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला एक वृद्ध महिला वय साधारण ७० वर्ष बसलेल्याअवस्थेत आढळली. ती एकाच जागेवर छत्री घेऊन बसलेली होती, चौकशी केल्यावर कळलं की ती मुळची उमरेडला राहणारी, तिच्या मुलांनी तिला तीन दिवसा आधी इथे आणून सोडले ती पूर्णपणे घाबरलेली होती पायांची अवस्था फार वाईट होती, मानसिक स्थिती बरोबर नव्हती परिस्थितीची गंभीरता लक्ष्यात घेता, वार्ताहर चंद्रशेखर गुरनुले यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांना संपर्क साधला व व्हिडिओ बनवून पाठवला. त्यानंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांनी तात्काळ एस.पी. मगर यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी जातीने लक्ष देत सावनेर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. मुळक यांना आदेश दिलेत. पी.एस. आय. मुळक फोन करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली व लागलीच त्यांनीही मदत केली. सावनेर परिसरात समाज सेवेकरिता प्रसिद्ध असलेले हितेश बनसोड यांच्याशी सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुळक यांनी संपर्क साधला व त्यांनी आपल्या यंत्रणेला लागलीच कामाला लावले व वृद्ध महिलेला घेण्याकरिता हितेश बनसोड आपले वाहन घेऊन घटना स्थळी पोहचले. वृद्ध महिलेवर वैद्यकीय उपचार करण्याकरीता सावनेर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या चौकशी नंतर तिने तिचे नाव विठाबाई गोपाळराव ठाकणे, वय ७० वर्ष राहणार उमरेड असे सांगितले. वृद्ध महिलेचे कपडे फाटलेले व भिजलेले होते स्वतः सावनेर पोलीस स्टेशन माणुसकीची वागणूक देत तिची काळजी घेतली व तिच्याकरिता नवीन कपडे, जेवणाची व्यवस्था करून दिली. डॉक्टर यांनी तपासल्यावर बी.पी. व शुगर कमी असल्याचे सांगितले, व त्यांनी योग्य ते उपचार केले. उपचारानंतर वृद्ध महिलेला सावनेर शासकीय रुग्णालयातून हितेश बनसोड व सावनेर पोलीस स्टेशनचे हवालदार यादव यांनी खापरखेडा येथील संजीवनीमाला या वृद्धाश्रमात हलवले. यात एस. पी. मगर, पी.एस. आय. मूळक, हवालदार यादव, हितेश बनसोड, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleभारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिगंबरराव देशमुख विद्यालय कांडाळा येथे उत्साहात साजरा.
Next articleतिसरा श्रावणी सोमवार निमित्त अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला।             
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here